चर्चा पुण्याची पण नागपूरचा सलग दुसरा पराभव जिव्हारी, पक्षाची खदखदही समोर; केंद्रीयमंत्री मुख्यमंत्र्यांसह एकट्या भाजपचे २१ आमदार तरीही!

0

राज्यात पाच जागांवर झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 3 जागा जिंकल्या. तर 2 जागांवर महायुती जिंकली. या निवडणुकीच्या निकालावरून सध्या महायुतीमध्ये लोकांचा संघर्ष सुरू असतानाही चर्चा फक्त पुणे पदवीधर मतदारसंघाचे केली जात आहे. पुण्यातील पराभवापेक्षा संघाचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नागपुरातही काँग्रेसने सलग दुसऱ्यांदा भाजपला धूळ चारली. नागपुरात काँग्रेसच्या विद्यमान अभिजीत वंजारींनी भाजपच्या सुधाकर कोहळेंना पराभूत केले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन्ही दिग्गज प्रचारासाठी मैदानात उतरल्यानंतरही भाजपचा पराभव झाला. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भरोशावर आणखी किती प्रचार चालणार, अशी विचारणा प्रदेश पदाधिकाऱ्यांना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे नागपूरमधील पराभव भाजपच्या जिव्हारी लागल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

नागपूर विभागात महायुतीचे 31 आमदार आहेत. तरी पदवीधर मतदारसंघात पराभव का? असा सवाल नागपूर विभागातील प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आलाय. नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचा सलग दुसरा पराभव झाला आहे. 6 जिल्ह्यांत महायुतीचे ३१ आमदार असतानाही पराभव का झाला, अशी विचारणा प्रदेश पदाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच भरोशावर प्रचार किती दिवस चालणार, असा सवालही उपस्थित करण्यात आल्याची माहिती आहे.

नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यांचा पदवीधर मतदारसंघात समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये विधानसभेचे ३२ आमदार असून, त्यापैकी २६ आमदार महायुतीचे आहेत. एकट्या भाजपचे २१ आमदार आहेत. विधानपरिषदेचे 5 सदस्य आणि राज्यसभेचे 2 खासदार असे राजकीय पाठबळही महायुतीकडे आहे. एवढे संख्याबळ असूनही महायुतीची ताकद मतांमध्ये का उतरली नाही, याचा वरिष्ठ स्तरावरून आढावा घेतला जाणार आहे. स्थानिक आमदारांनी पदवीधर मतदारांपर्यंत किती संपर्क साधला आणि मतदानासाठी किती प्रयत्न केले, याची तपासणी होणार आहे. मतदार नोंदणी, स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या आणि प्रत्यक्ष मतदानाचे नियोजन यांचाही आढावा घेतला जाणार आहे. महायुतीतील घटकपक्षांमध्ये प्रचारादरम्यान किती समन्वय होता, याचीही चाचपणी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि बावनकुळे यांच्या सभांवर प्रचार अधिक अवलंबून राहिल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरू असल्याचे वृत्त आहे.

अधिक वाचा  वारं फिरलं, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची धुव्वादार बॅटिंग, IMD चा अलर्ट; विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत