वाचाळ आमदार संजय गायकवाड यांचे निलंबन? शेतकरी अन्नदाता त्याच्याविरोधात कोणतीही विधाने….; एकनाथ शिंदेंकडून थेट आदेश

0

आमदार संजय गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे राजकारणात एकच खळबळ पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वादग्रस्त वक्तव्यांसाठी कुप्रसिद्ध असणारे बुलढाण्यातली शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या टिप्पणीमुळे राजकारणासह सर्वत्र टीकेची झोड उठली होती. तथापि, आमदार संजय गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

शेतकरी आपला अन्नदाता असून त्याच्याविरोधातील कोणतीही विधाने खपवून घेतली जाणार नाहीत, अशी तंबी देत संजय गायकवाड यांच्यावर शिवसेना पक्षातून निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत, असे सूत्रांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेची धाव

शेतकऱ्यांच्या प्रत्येक संकटात शिवसेना मदतीला धावून जाते. राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेनेने व्यापक मदत मोहीम सुरू केली आहे. शेतकरी कुटुंबांतील लाडक्या बहिणींना २५ हजार शिलाई मशिन्सचे वाटप केले जात असून शेतकऱ्यांच्या मुलींना २५ हजार सायकली दिल्या जात आहेत.तसेच दसरा मेळाव्यात शिवसेनेने १०० ट्रक अन्नधान्य दुष्काळग्रस्त भागात पाठवले आहे. गुरुवारी आणखी २४ ट्रक धान्य पाठवण्यात आले.

अधिक वाचा  सामायिक सातबाराबाबतच्या परिपत्रकामुळे शहरी भागात गंभीर समस्या निर्माण अडचणीवर उपाय शोधा: उज्वल केसकरांची मागणी