बहुप्रतीक्षित जनगणना 2027 ची मोठी अपडेट: तारीख अन् प्रश्नांची यादी जाहीर! विचारले जाणाऱ्या 40 प्रश्नांनी संपूर्ण यादीही जाहीर 

0

केंद्र सरकारने बहुप्रतीक्षित राष्ट्रीय जनगणनेच्या (Census 2027) तारखांची घोषणा केली आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, देशभरात जनगणनेचे काम 25 जानेवारी ते 28 फेब्रुवारी 2027 या कालावधीत पूर्ण केले जाणार आहे. प्रशासकीय कारणे आणि भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, बर्फाच्छादित भाग आणि आगामी निवडणुका असलेल्या राज्यांना या कालावधीतून वगळण्यात आले आहे. भारतात जनगणनेचे आयोजन ‘जनगणना कायदा, 1948’ आणि ‘जनगणना नियम, 1990’ मधील तरतुदींनुसार केले जाते. यावेळी जनगणनेदरम्यान विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची यादी सरकारने आधीच जाहीर केली होती.

जनगणना 2027 : नागरिकांना कोणते प्रश्न विचारले जाणार?

जनगणनेदरम्यान नागरिकांकडून वैयक्तिक माहिती, कुटुंब, शिक्षण, रोजगार, स्थलांतर आणि इतर विविध विषयांशी संबंधित माहिती विचारली जाणार आहे. यामध्ये पुढील प्रश्नांचा समावेश आहे.

  • 1. व्यक्तीचे नाव
  • 2. कुटुंबप्रमुखाशी असलेले नाते
  • 3. लिंग (पुरुष/महिला/इतर)
  • 4. जन्मतारीख आणि वय
  • 5. सध्याची वैवाहिक स्थिती
  • 6. विवाहाच्या वेळी असलेले वय
  • 7. पती किंवा पत्नीचे नाव
  • 8. राष्ट्रीयत्व
  • 9. धर्म
  • 10. अनुसूचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) संदर्भातील माहिती
  • 11. वडिलांचे नाव आणि माहिती
  • 12. आईचे नाव आणि माहिती
  • 13. दिव्यांगत्वाची स्थिती (असल्यास)
  • 14. मातृभाषा आणि इतर ज्ञात भाषा
  • 15. साक्षरता आणि डिजिटल साक्षरतेची स्थिती
  • 16. शैक्षणिक संस्थेत उपस्थिती किंवा शिक्षणाची स्थिती
  • 17. प्राप्त केलेली सर्वोच्च शैक्षणिक पात्रता आणि विषय
  • 18. मागील एका वर्षातील कामाची स्थिती
  • 19. आर्थिक कार्याच्या श्रेणीची माहिती (मुख्य किंवा सीमांत कामगार)
  • 20. व्यवसाय किंवा पेशा
  • 21. उद्योग, व्यापार किंवा सेवेचा प्रकार
  • 22. कामगाराची श्रेणी (मालक, कर्मचारी किंवा कौटुंबिक कामगार)
  • 23. गैर-आर्थिक कामाचे स्वरूप
  • 24. कामाच्या शोधात आहात का किंवा कामासाठी उपलब्ध आहात का?
  • 25. कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी वापरले जाणारे वाहतुकीचे साधन आणि अंतर
  • 26. जन्मस्थान
  • 27. पूर्वीचे निवासस्थान
  • 28. स्थलांतराचे कारण
  • 29. सध्याच्या ठिकाणी राहण्याचा कालावधी
  • 30. कायमचा पत्ता
  • 31. सध्या जिवंत असलेल्या मुलांची संख्या (संबंधित महिलांसाठी)
  • 32. आतापर्यंत जन्मलेल्या एकूण जिवंत मुलांची संख्या
  • 33. मागील एका वर्षात जन्मलेल्या जिवंत मुलांची संख्या
  • 34. कोविड-१९ लसीकरणाची माहिती आणि ठिकाण
  • 35. बँक खात्यांची संख्या2
  • 36. मोबाईल क्रमांक
  • 37. आधार क्रमांक (स्वेच्छेने किंवा उपलब्ध असल्यास)
  • 38. मतदार ओळखपत्र क्रमांक (उपलब्ध असल्यास)
  • 39. पासपोर्ट क्रमांक (उपलब्ध असल्यास)
  • 40. वाहन चालवण्याचा परवाना उपलब्ध आहे का?
अधिक वाचा  झाडणकाम सध्या सुरू कामालाच मुदतवाढीसाठी जोरदार ‘लॉबिंग’ तात्काळ थांबवा: उज्वल केसकरांची आयुक्तांकडे धाव

2021 मध्ये होणार होती जनगणना, मग 5 वर्षांनंतर का होत आहे?

देशात यापूर्वीची जनगणना 2011 मध्ये दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर 2021 मध्येही दोन टप्प्यांत जनगणना घेण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानुसार पहिला टप्पा एप्रिल ते सप्टेंबर 2020 या कालावधीत तर दुसरा टप्पा फेब्रुवारी 2021 मध्ये आयोजित करण्याचे नियोजन होते. यासाठी प्रत्यक्ष स्तरावर सर्व तयारी पूर्ण करण्यात आली होती आणि 1 एप्रिल 2020 पासून क्षेत्रीय कामाला सुरुवात होणार होती.

मात्र देशभरात पसरलेल्या कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे ही संपूर्ण प्रक्रिया अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. आता सरकारने 2027 मध्ये जनगणना घेण्यासाठीची औपचारिक रूपरेषा जाहीर केली आहे.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी