पुणे पदवीधर निवडणुक: पुण्याची फक्तं चर्चा पण गृहजिल्ह्यातील ‘कांडका’च धक्कादायक, नेमकं काय घडलं?

0

पुणे: पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी विजय मिळवून विधान परिषदेच्या राजकारणात प्रवेश केला. महाविकास आघाडीच्या उमेदवार असलेल्या हर्षदा यांनी भाजपच्या डॉ. स्मिता योगेश जाधव यांचा ९ हजार ९२८ मतांनी पराभव केला. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत विजयासाठी आवश्यक कोटा कोणत्याही उमेदवाराला गाठता आला नाही. त्यामुळे पसंतिक्रमानुसार मतांचे हस्तांतरण आणि बाद फेऱ्यांची प्रदीर्घ प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत हर्षदा यांनी आपली आघाडी कायम राखून शेवटच्या फेरीत विजयासाठीचा कोटा पूर्ण केला.

कोल्हापूर आणि सांगली जिल्हा मिळून १ लाख २२ हजार मतदान झाले होते. एकूण झालेल्या मतदानाच्या ५० टक्के मतदान केवळ या दोन जिल्ह्यांत झाले होते. स्मिता जाधव मूळ कोल्हापूरमधील असल्याने त्याचा त्यांना फायदा होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात वैध मतांची तपासणी करतानाच कोल्हापूर जिल्ह्यातून त्यांना फटका बसत असल्याचे चित्र उमटले होते. त्याचा थेट परिणाम निकालात जाणवल्याचा कयास राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

मताधिक्य कायम, अंतरात वाढ

मतमोजणीच्या २१व्या बाद फेरीअखेर हर्षदा देशमुख-जाधव यांना १ लाख ११ हजार २७९, तर डॉ. स्मिता जाधव यांना १ लाख २ हजार ४२७ मते मिळाली होती. त्या वेळी हर्षदा यांची आघाडी ८ हजार ८५२ मतांची होती. पुढील फेऱ्यांमध्ये दोन्ही उमेदवारांच्या मतसंख्येत वाढ झाली. मात्र, हर्षदा यांनी आघाडी कायम राखली. ३९व्या बाद फेरीअखेर हर्षदा यांना १ लाख ११ हजार ७१७, तर डॉ. स्मिता जाधव यांना १ लाख १ हजार ७९७ मते मिळाली. दोघींमधील मतांचे अंतर वाढून ८ हजार ९२० झाले. या टप्प्यावर विजयासाठी निश्चित करण्यात आलेल्या सुमारे १ लाख १३ हजार ९५ मतांच्या कोट्यापासून हर्षदा १,३७८ मतांनी दूर होत्या. त्यानंतरच्या मतमोजणीत त्यांचा विजय निश्चित झाला.

अधिक वाचा  पुन्हा नवा डाव पुन्हा मनोमिलन? महायुतीत टोकाची तु तु मैं मैं असतानाच फडणवीसांसह ठाकरे बंधूंची बंद दाराआड चर्चा

मतमोजणीच्या २१व्या बाद फेरीअखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुनील मोदी यांना ३ हजार ६६, सोमनाथ साळुंखे यांना २ हजार ६३८, नामदेवराव जाधव यांना १ हजार ९५५, तर लक्ष्मण हरणावळ यांना १ हजार ४७२ मते मिळाली होती. या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीच्या मतांचे हस्तांतरण मतमोजणी प्रक्रियेचा भाग होते.

शिवसेनेचा प्रभाव दिसला नाही

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सुनील मोदी हे मूळचे कोल्हापूर येथील असून, त्यांना किमान १० हजार मते मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात येत होता. मोदी यांना मिळणारी मते ही महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा शकणारी होती. कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याने स्मिता जाधव यांच्या विरोधातील मतांचे विभाजन होईल; तसेच मोदी यांना मिळणारी दुसऱ्या क्रमांकांच्या मतांचाही त्यांना फायदा होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती. प्रत्यक्षात तसे झाले नाही.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत