बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस? हवामान विभागाचा मोठा इशारा!

0

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचे सावट असताना हवामान खात्याच्या वतीने धक्कादायक परंतु आनंदाची बातमी आली आहे. दिवाळी सणाची लगबग सुरू असताना आणि बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी उसळत असतानाच हवामान विभागाने चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाचे सावट निर्माण झाले असून, दुसरीकडे अरबी समुद्रातही कमी दाबाचे क्षेत्र तीव्र झाले आहे.

या दुहेरी वादळी प्रणालींमुळे देशाच्या पूर्व आणि दक्षिण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, याचे ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्यास ऐन सणासुदीत पावसाचा येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, २३ ते २९ ऑक्टोबरदरम्यान देशातील हवामानात वेगाने मोठे बदल होणार आहेत.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक

ऐन दिवाळीत पावसाचे सावट; महाराष्ट्रातील वातावरणात काय बदल?

बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही बाजूंनी बाष्पयुक्त वारे सक्रिय झाल्यामुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत दुपारनंतर मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा शिडकावा होऊ शकतो.दिवाळीच्या खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना आणि शेतात काढून ठेवलेल्या पिकांची काळजी घेणाऱ्या शेतकऱ्यांना हवामानातील या अनपेक्षित बदलांचा मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होणारी वादळी प्रणाली पश्चिमेकडे सरकताना अधिक रौद्ररूप धारण करणार आहे. २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी ओडिशा आणि किनारपट्टीच्या आंध्र प्रदेशात २०० मिमीपेक्षा जास्त मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

अधिक वाचा  नागपूर पदवीधर ६४.७६ टक्के मतदान वर्धा, गडचिरोलीत सर्वाधिक प्रतिसाद; नागपूरमध्ये निरुत्साहच टक्केवारीही घटली

२९ ऑक्टोबरपर्यंत या भागात अतिवृष्टीचा जोर कायम राहणार असून, सोसाट्याचा वारा आणि उसळणाऱ्या लाटांमुळे मच्छिमारांना खोल समुद्रात न जाण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.

दुसऱ्या बाजूला आग्नेय अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये पावसाने आधीच हाहाकार उडवला आहे. पुद्दुचेरी आणि कराईकल परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचले असून, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने सर्व सरकारी व खासगी शाळांना तातडीने सुट्टी जाहीर केली आहे.

कर्नाटक आणि तेलंगणामध्येही २९ ऑक्टोबरपर्यंत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांना हवामानाच्या ताज्या अंदाजावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार