शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

0

महाराष्ट्रामध्ये गोकुळची निवडणूक महाविकास आघाडी विजयी झाल्यानंतर आज होऊ घातलेल्या महाराष्ट्रातील शिक्षक मतदार संघातील मतदानाच्या दिवशी सत्ताधारी पक्षाकडून लक्ष्मी दर्शन केल्याच्या आरोपांचा सिलसिला राज्यापुरता मर्यादित राहिला नाही. महाराष्ट्रातील पाच विभागांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती आरोप प्रत्यारोप करत असताना थेट एक धक्कादायक “सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरुन उघडपणे बूथवर ताबा मिळवला आहे” अशी बातमी समोर आली आहे. आजच्या दिवशी उत्तर प्रदेशमध्ये शिक्षक आणि पदवीधर विधान परिषद निवडणुकीला रंग चढला आहे. या निवडणुकीमध्ये आता मोठा राजकीय संघर्ष् पाहायला मिळतो आहे. आग्रामधील ब्लॉक शिक्षक मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे उमेदवार हे कॅमेरासमोरच ढसाढसा रडले आहेत. आपण धर्मांतर करणार असल्याचा दावा करत त्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि सत्ताधारी पक्षाला आपले धर्मांतर घडवून आणल्याचा आरोप केला आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार

समाजवादी पक्षाचे उमेदवार आकाश अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना आरोप केला की, प्रशासनाने सत्ताधारी पक्षाच्या सांगण्यावरुन उघडपणे बूथवर ताबा मिळवला आहे. त्यांनी असाही दावा केला की खेरागढमधील बूथ क्रमांक २० वर उमेदवाराच्या भाच्याने पूर्णपणे ताबा मिळवला असून त्याने हा संपूर्ण बूथच लूटला आहे. यासंदर्भातील व्हिडिओही आपल्याकडे असल्याचा त्यांचा दावा असून हा व्हिडिओ आपण आयुक्तांना पाठवला असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधान परिषदेच्या ११ जागांवर आज मतदान पार पडत आहे. यामध्ये पाच पदवीधर आणि सहा शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. लखनौ, वाराणसी, आग्रा, मेरठ आणि अलाहाबाद-झांसी या पदवीधर जागांचा समावेश आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ चंद्रकांतदादांचा पुण्यातही घरोघरी प्रचार; महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयीचा निर्धार