२-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

0

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे. पाच जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काल मतदानाची टक्केवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीला ३, तर महाविकास आघाडीतील काँग्रेसला २ जागेवर यश मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याचा दावा आहे. मात्र, हा केवळ अंदाज असून अधिकृत निकाल २७ ऑक्टोबरला जाहीर होणार आहे.

राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडी यांची सध्या कालीन जवळील फक्त कागदावरच राहिल्याने पार पडलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकमेकांना जागा दाखवण्याची भूमिका दोन्ही बाजूने केली गेल्याने ही कागदावरील एकी प्रत्यक्षात मतदानाच्या मैदानात मात्र एकमेकांच्या विरोधात दंड थोपाटत असल्याने स्वतंत्र झालेल्या या मतदानांमध्ये निकाल काय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील राजकीय एकी याच निकालावर अवलंबून असून आगामी दोन वर्षाची वाटचाल कशी करायची यावर शिक्कामोर्तब ही याच निवडणुकीच्या निकालावरून होणार आहे.

अधिक वाचा  दुसरी पसंती ठरवणार पुण्याचा शिक्षक आमदार, नेमकं गणित काय? निकालाआधीच सोप्या शब्दात समजून घ्या

एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाला किती जागांचा अंदाज?

भाजप : २ जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : १ जागा

काँग्रेस : २ जागा

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) : ० जागा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ० जागा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) : ० जागा

पुणे पदवीधर : वाढलेली टक्केवारी पक्षांतरे आणि सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी?

पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे. एक्झिट पोलमध्ये डॉ. स्मिता जाधव यांचे पारडे जड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मतदारसंघात सांगली सोलापूर आणि सातारा या ठिकाणी वाढलेले मतदान ही खरी या निवडणुकीची मेक असून त्यावरच भाजपच्या पदरी सहा वर्षांपूर्वी गमावलेली जागा पुन्हा मिळणार का याचे भवितव्य ठरणार आहे. ठाकरे गटाचे सुनील मोदी यांच्यासह अन्य उमेदवारही रिंगणात होते. त्यामुळे अंतिम निकालात मतविभाजनाचा किती परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक वाचा  विजयादशमीला कोथरूडकरांना मराठी ‘रामलीला’ आणि भव्य ‘रावणदहन’ची पर्वणी; ‘कथा शौर्याची माझ्या श्रीरामाची’ नाट्यप्रयोगालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे शिक्षक : तिहेरी मत विभागणी काँग्रेसच्या पथ्यावर?

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर, शिवसेना (शिंदे गट) समर्थित अपक्ष सचिन सानप आणि माजी आमदार दत्तात्रय सावंत यांच्यात लढत झाली. महायुती विचारसरणीचे सुमारे तीन उमेदवार प्रबळ दाव्यासह मैदानात उतरल्यामुळे विद्यमान आमदाराला याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

छत्रपती संभाजीनगर पदवीधर : सतीश चव्हाण आघाडीवर?

छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे सतीश चव्हाण, डॉ. प्रतापसिंह पाटील आणि दिलीप घुगे यांच्यासह एकूण ४१ उमेदवार रिंगणात होते. एक्झिट पोलच्या माहितीनुसार, सतीश चव्हाण यांचे पारडे जड असल्याचा अंदाज आहे.

अमरावती शिक्षक : काँग्रेसच्या अदिती पोहरे यांना संधी?

अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेसच्या अदिती पोहरे आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) समर्थित विद्यमान आमदार किरण सरनाईक यांच्यात प्रमुख लढत आहे. एक्झिट पोलमध्ये अदिती पोहरे यांचे पारडे जड असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याचे दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

अधिक वाचा  एसएनडीटी मेट्रो स्टेशन वाहतूक कोंडी मुक्त? ‘या शासकीय जागेचा वापर करा’ पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी

नागपूर पदवीधर : भाजपच्या सुधाकर कोहळे यांच्याकडे लक्ष

नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपचे सुधाकर कोहळे, काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी आणि अपक्ष नितेश कराळे यांच्यात लढत झाली. एक्झिट पोलमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे यांचे पारडे जड असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या मतदारसंघातील निकालाकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अधिकृत निकाल २७ ऑक्टोबरला

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर तसेच पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबर रोजी मतदान झाले. या पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार रिंगणात होते. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यानंतरच कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, हे स्पष्ट होईल.