सामाजिक बांधिलकीचा संवेदनशील ‘दीपक’; संघनिष्ठ दृढसंकल्पी कार्यकर्त्याचा खासदिनीही संवेदनशील उपक्रम

0

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन २ नोव्हेंबर रोजी आपला वाढदिवस उत्सवाऐवजी सामाजिक कर्तव्य म्हणून साजरा करण्याचा संकल्प एका संघनिष्ठ, दृढसंकल्पी पुणे शहर भाजपा सरचिटणीस माजी नगरसेवक दीपक पोटे या कार्यकर्त्याने केला आहे. सामाजिक बांधिलकीचा संवेदनशील चेहरा म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या ‘दीपक’ पोटे यांनी वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमातून सामाजिक जाणिवा, संवेदनशीलता आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित होत आहे.

वाढदिवस म्हटला की हार, पुष्पगुच्छ, भेटवस्तू आणि शुभेच्छांचा वर्षाव हे चित्र सर्वसाधारणपणे पाहायला मिळते. मात्र, यंदा राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असताना, वैयक्तिक आनंदापेक्षा गरजूंच्या मदतीला प्राधान्य देण्याचा विचार माजी नगरसेवक दीपक पोटे यांनी मांडला आहे. आपल्या आनंदाच्या दिवसातून समाजातील वंचित आणि संकटग्रस्त घटकांना दिलासा मिळावा, हीच या उपक्रमामागील प्रमुख भावना असल्याचे नगरसेवक दीपक पोटे यांनी सांगितले आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

हार-पुष्पगुच्छ नको, मदतीचा हात द्या!

माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी कोणतेही हार, पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तू आणू नयेत, असे आवाहन दीपक पोटे यांनी केले आहे. त्याऐवजी दुष्काळग्रस्त बांधवांसाठी गहू, तांदूळ, डाळी तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू स्वरूपात मदत घेऊन यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.

या माध्यमातून जमा होणारी मदत थेट गरजूंपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वाढदिवसाच्या शुभेच्छांना केवळ औपचारिकतेपुरते मर्यादित न ठेवता, त्या प्रत्यक्ष सामाजिक कार्यात परिवर्तित करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून दीपक पोटे मित्र परिवाराच्या वतीने केला जाणार आहे.

अधिक वाचा  झाडणकाम सध्या सुरू कामालाच मुदतवाढीसाठी जोरदार ‘लॉबिंग’ तात्काळ थांबवा: उज्वल केसकरांची आयुक्तांकडे धाव

मदतीच्या शुभेच्छांसाठी स्वतः उपस्थित राहणार

२ नोव्हेंबर रोजी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी दीपक स्वतः उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी उपस्थित राहून या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे, तसेच दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘तुमचा हाच पुढाकार माझ्यासाठी वाढदिवसाची सर्वात मोठी भेट असेल,’ अशी भावनिक साद त्यांनी नागरिकांना घातली आहे. वैयक्तिक आनंदाचा दिवस समाजातील गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविण्यासाठी वापरण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.

सामाजिक बांधिलकीचा आदर्श

समाजातील संकटग्रस्त घटकांना मदत करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने पुढाकार घेण्याची गरज आहे. दुष्काळासारख्या गंभीर परिस्थितीत अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत अनेक कुटुंबांसाठी मोठा आधार ठरू शकते. अशा वेळी वाढदिवसासारख्या वैयक्तिक आनंदाच्या प्रसंगाला सामाजिक कार्याची जोड देणारा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छांपेक्षा गरजूंच्या चेहऱ्यावरील समाधान अधिक मोलाचे! दीपक यांच्या या संवेदनशील उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा एक नवा आदर्श समोर येत असून, त्यांच्या या संकल्पाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा  बहुप्रतीक्षित जनगणना 2027 ची मोठी अपडेट: तारीख अन् प्रश्नांची यादी जाहीर! विचारले जाणाऱ्या 40 प्रश्नांनी संपूर्ण यादीही जाहीर