यंदा दिवाळी किती दिवसांची? धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन ते भाऊबीज; पाहा सणांच्या तारखा, वार आणि शुभ मुहूर्त!

0

पुढच्या आठवड्यात दिवाळी हा सण सर्वत्र साजरा केला जाईल. त्यासाठी आतापासूनच बाजारपेठा सजू लागल्या आहेत. बाजारात रंगीबेरंगी कंदील, रांगोळ्या आणि पणत्या पाहायला मिळत आहेत. तर कपड्यांच्या दुकानांमध्येही नवनवीन आणि आकर्षक कपड्यांचे कलेक्शन लागले आहे. एवढंच नाही तर लहान मुलांचे आवडत्या फटाक्यांनी सुद्धा हजेरी लावलेली दिसते आहे.

अशातच काही जण दिवाळीच्या सुट्ट्यांच्या नियोजनाच्या तयारीला सुद्धा लागले असतील. काहींना शाळा-कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये बाहेर किंवा गावी जाण्याचे वेध लागले असतील, तर नोकरी करणारे कर्मचारीही कोणत्या दिवशी सुट्टी घ्यावी, याचा विचार करत असतील. अशा वेळी दिवाळीत नेमके कोणते सण कोणत्या दिवशी येणार आहेत, हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे तुमचे सुट्ट्यांचे नियोजन सोपे व्हावे यासाठी आम्ही दिवाळीतील सणांची तारीख आणि वार यांसह सोपी यादी घेऊन आलो आहोत.

अधिक वाचा  वारजे बदलतेय! पुण्यातील पहिल्या डिजिटल ‘सेवाधाम’ची अनोखी भेट; २४ तास तक्रार निवारण केंद्रासह विविध नागरी सुविधांचे भव्य लोकार्पण!

५ नोव्हेंबर (गुरूवार) – वसुबारस

६ नोव्हेंबर (शुक्रवार) – धनत्रयोदशी

८ नोव्हेंबर (रविवार) – अभ्यंगस्नान, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन

१० नोव्हेंबर (मंगळवार) – दीपावली पाडवा

११ नोव्हेंबर (बुधवार) – भाऊबीज

२१ नोव्हेंबर (शनिवार) – तुळशी विवाह

धनत्रयोदशी पूजा मुहूर्त

६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशीची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ६ वाजून २ मिनिटांपासून ते ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असणार आहे. या दिवशी प्रदोष काळ संध्याकाळी ५ वाजून ३३ मिनिटांपासून रात्री ८ वाजून ९ मिनिटांपर्यंत असेल.

लक्ष्मीपूजन मुहूर्त

८ नोव्हेंबर २०२६ रोजी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी ५ वाजून ५४ मिनिटांपासून ते ७ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

नरक चतुर्दशी मुहूर्त

८ नोव्हेंबर २०२६ रोजी नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून तेल लावून स्नान करण्याची परंपरा आहे. अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त पहाटे ५ वाजून ४१ मिनिटांपासून ते ६ वाजून ३८ मिनिटांपर्यंत असणार आहे.

भाऊबीज मुहूर्त

११ नोव्हेंबर २०२६ रोजी भाऊबीजेची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून १० मिनिटांपासून ते ३ वाजून २० मिनिटांपर्यंत असणार आहे.

(तळटीप – वरील माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकायत या गोष्टींना दुजोरा देत नाही.)

अधिक वाचा  महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सत्ताधाऱ्यांना सत्तेवरून पायउतार करण्याची ताकद निर्माण करा – विजय तांबे