झाडणकाम सध्या सुरू कामालाच मुदतवाढीसाठी जोरदार ‘लॉबिंग’ तात्काळ थांबवा: उज्वल केसकरांची आयुक्तांकडे धाव

0

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत पुणे महापालिकेच्या पदसिद्ध अधिकाऱ्यामार्फत ठराविक ठेकेदारांसाठी जोरदार लॉबिंग सुरू करण्यात आली असून शासकीय नियमांनाही बगल देत स्व-हित धार्जिण्या ठेकेदारासाठी गैरप्रकार केला जात असून पुणे महापालिका आयुक्त यांनी विशेष लक्ष घालून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी माजी विरोधी पक्ष नेते उज्वल केसकर यांच्या वतीने लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे.

पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त इस्टेट यांनी केलेल्या एसओपीप्रमाणे झाडण काम परफॉर्मन्स बेस (performance based) याच्या निविदा भरण्याची मुदत दोन तारखेपर्यंत होती. या कामासाठी संभाव्य स्पर्धा टाळावी या कारणास्तव त्या निविदा आता अचानक पणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरनं काढून टाकलेले आहेत. याबरोबरच पुणे महापालिका झोन उपायुक्त ५ यांनी तांत्रिक कारणासाठी रद्द केले आहेत या पत्राची प्रतही आयुक्त यांना निवेदनासोबत देण्यात आली आहे.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

स्पर्धा खूप होईल अशी भीती

सध्याच्या काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या मनामध्ये स्पर्धा खूप होईल अशी भीती आहे अशी चर्चा महानगरपालिकेच्या वर्तुळामध्ये आहे.  त्यामुळे निविदा न भरता आत्ता सध्या चालू असलेल्या कामाला मुदतवाढ द्यावी असं जोरदार लॉबिंग चालू असल्याचे कळते. मुळात निविदा त्याच्या अटी शर्ती या सीबीसी ‘गाईडलाईन’चा याबाबतही आपणास काल पत्र दिले होते. आता या कंत्राटदारालाच मुदतवाढ देऊन त्याला स्थायी समितीची मुख्य सभेची मान्यता घेण्याचा प्रयत्न जोरदार चालू आहे असे कळते.

पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत सुरू असलेल्या या प्रक्रिया हे संपूर्णपणे बेकायदेशीर असून मुळात हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयोगच बेकायदेशीर आहे. यात महापालिकेचे १५० कोटी रुपयांचा नुकसान आहे. आपण यामध्ये लक्ष घालावे आणि हा विषय कायमचा बंद करून महानगरपालिकेचे कायम स्वरूप सफाई कर्मचारी आणि आवश्यकता असणारे कंत्राटदारांचे कर्मचारी या दोघांचा योग्य मेळ घालून काम करावे अशी विनंती आपले पुणे आपला परिसर तर्फे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी माजी विरोधी पक्षनेते, प्रशांत बधे माजी नगरसेवक, मुकारीअण्णा अलगुडे माजी उपमहापौर यांच्या वतीने करण्यात आली आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?