म्हसळा: (रामदास धो. गमरे) फळसप ग्राम सुधारणा मंडळ, मुंबई (रजि.) यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दि. २०ऑक्टोबर २०२६ विजयादशमी रोजी सायं. ६.०० वाजता मंडळाचे अध्यक्ष अजित रामचंद्र विचारे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ६५ वे दसरा स्नेहसम्मेलन सायं. ७.०० वाजता मंडळाचे सदस्य सुभाष परशुराम साळवी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सदर प्रसंगी विजयादशमी सणाचे औचित्य साधून गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ व सेवानिवृत्त सभासद सुनिल आत्माराम विचारे व उदय गोविंद विचारे या सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभ श्री सोमजाई जाखमाता सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे नवनिर्वाचित विश्वस्त व सन्माननिय चेअरमन रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अभिषेकभाई भास्कर विचारे व्हाईस चेअरमन बळीराम गंगाराम विचारे, व्हॉईस चेअरमन रविंद्र रघुनाथ विचारे, विद्यमान कार्याध्यक्ष रुपेश एकनाथ विचारे, सल्लागार यशवंत बापू विचारे, जयवंत बाळा विचारे, बबन गौरु विचारे, फळसप ग्रामपंचायतीचे सरपंच सुधीर परशुराम साळवी समाजभूषण भगवान परशुराम साळवी, माजी सचिव रमेश बाबाजी विचारे, माजी सदस्य यशवंत शिवराम साळवी, मा. उपाध्यक्ष विश्वास नामदेव विचारे, चिटणीस संजय यशवंत साळवी, सुनिल आत्माराम विचारे, खजिनदार सचिन अनंत विचारे कार्यकारी सदस्य संतोष नामदेव विचारे, संदिप सदाशिव सावंत, संतोष बाळाराम साळवी, महेश सुरेश विचारे व आजी-माजी कार्यकारिणी व सभासद यांच्या उपस्थितीत विधाभूषण शिक्षण संस्था, शिवाई संकूल, अशोकवन, रावलपाडा, दहिसर (पू), मुंबई- ४०००६८ येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
सरतेशेवटी सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि सभासदांचे व बहुमुल्य सहकार्य करणारे सरचिटणीस राजेश रमेश विचारे यांचे आभार मानून सुभाष परशुराम साळवी यांनी कार्यक्रमाची सांगता केली.



