गुहागर : दि. २८ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर जिल्हा रत्नागिरी गाव व मुंबई तसेच संलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आयोजित वर्षावास मालिकेचा सांगता समारोह आणि संघाच्या पंचाहत्तरावा अमृत महोत्सवानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिर रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, जानवळे (शृंगारतळी) येथे मुंबई संघाचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गमरे तर पाहुण्यांचे स्वागत विमा वैभव गमरे करणार आहेत, गुहागर शासकीय रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांच्या अधिपत्याखाली रक्तगट तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तसाखर तपासणी, इसीजी, नेत्र तपासणी अशी मोफत तपासणी आरोग्य शिबिराच्या मार्फत करण्यात येणार आहेत, सदर कार्यक्रमास गाव व मुंबई संघाचे विश्वस्त, मध्यवर्ती कमिटी, विभाग अधिकारी, विविध समित्यांचे पदाधिकारी, महिला मंडळ, बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तरी गुहागर तालुक्यातील सर्वच गावातील शाखा, शाखा पदाधिकारी, सभासद, सदस्य सर्व बौद्ध उपासक उपासिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन गाव व मुंबई संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आली आहे.



