शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी

0

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लीपनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.या भेटीत शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर, खासदार मिलिंद देवरा, माजी खासदार राहुल शेवाळे,आमदार राहुल पाटील, खासदार रवींद्र वायकर, दीपक सावंत उपस्थित होते. शिवसेना नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या नावांचा उल्लेख येतो, त्यांचा भूमिका तपासाव्यात, असं निवेदन दिल्याचं राहुल शेवाळे यांनी सांगितलं. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचा शब्द दिल्याचं सेना नेत्यांनी सांगितलं.

सचिन अहिर काय म्हणाले?

आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्याचं काम केलं आहे. मनोज जरांगे यांनी नाहक आणि ज्याला काही अर्थ नाही, असा आरोप करण्याचं केलं. मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपाचं खंडन एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मात्र, पक्ष म्हणून या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असचं सचिन अहिर म्हणाले. सायबर क्राईम, इंटेलिजन्सच्या लोकांच्या माध्यमातून चौकशी करुन लवकरात लवकर वस्तुस्थिती समोर येण्याची गरज आहे. काही लोक स्वत:चं अस्तित्व टिकवण्यासाठी अशा प्रकारचे आरोप करत आहेत. मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, कोणाची गय केली जाणार नाही, असं म्हटलं, असं सचिन अहिर म्हणाले.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

राहुल शेवाळे काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे वक्तव्य केलं ते निंदनीय आणि बदनामीकारक आहे. म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो. मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांसमोर सादर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक आणि सायबर सेल द्वारे सत्य समोर आणावे आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केलेली आहे. या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विषयी केलेली कथित वक्तव्य आक्षेपार्ह आणि बदनामीकारक आहेत, अशी मागणी केल्याचं राहुल शेवाळे म्हणाले.

या प्रकरणामागे काही कटकारस्थान आहे का? राज्यातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा कोणाचा डाव आहे का याची सत्यता तपासण्याची गरज आहे, अशी मागणी केल्याचं राहुल शेवाळे म्हणाले. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्याबाबत एका महिलेने केलेल्या वक्तव्याची विशेष दखल घेणे गरजेचे आहेत. संबंधित महिला कोण आहे? तिने कोणत्या आधारावर ही विधाने केली? तिच्याकडे याबाबत पुरावे आहेत का? तिला ही माहिती कोणी दिली याची चौकशी झाली पाहिजे. माध्यमांमध्ये राजकीय वर्तुळात या संभाषणात सहभागी व्यक्तींचा संबंध भाजपशी असल्याची चर्चा सुरु आहे. तथापि त्याबाबतची अधिकृत माहिती नाही. आमदार निरंजन डावखरे आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या नावाचा उल्लेख यात आहे. या नेत्यांकडे त्याबाबत विचारणा व्हावी. या क्लिपमध्ये काही नावं आली आहेत, त्यात अतुल, निखील, श्वेताजी, गिरीष, अजयची, जितेनभाई, सुशीलकुमार, पावरा या व्यक्ती नेमक्या कोण आहेत, त्यांची राजकीय संलग्नता आणि भूमिका काय तपासली गेली पाहिजे.

अधिक वाचा  एकनाथ शिंदेंचं 500 कोटींच्या बॉम्बवरुन जरांगेंना प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल

महायुतीतील घटक पक्षातील नेत्यांची बदनामी आणि सहकारी पक्षांविषयी अवमानकारक वक्तव्यं करण्याचे प्रयत्न होत असतील तर संबंधितांना कोणतंही राजकीय संरक्षण मिळू नये ही आमची मागणी आहे, असं राहुल शेवाळे यांनी सांगितलं.