राज्यातील ५ विधानपरिषद निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये, पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघतात मतदान आहे. तसेच, पुणे, अमरावती आणि नागपूरमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागांसाठी मतदान आहे. त्याच पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची दर 6 वर्षांनी होणारी निवडणूक असून आज सकाळी 8 वाजतापासून मतदान सुरू झालं आहे. मी कोल्हापूरच्या आढावा घेऊन इकडे आलो, एका केंद्रावर जाऊन मतदारांना भेट देवून आलो आहे, मतदारांना गुलाबाचं फुलही दिल्याचं चंद्रकात पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
पुणे मतदारसंघातील पाच जिल्ह्याच्या मतदारसंघात सगळ्या उमेदवाराने प्रचाराचा धुराळा उडवला असून भाजपच्या दोन्ही उमेदवारांना मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे. स्मिता जाधव या प्रबोधन करणाऱ्या कुटुंबातील आहेत, त्या पीडी पाटील यांच्या कन्या आहेत, याशिवाय डी.वाय. पाटील यांच्या नात आहेत. तर, कौस्तुभ गावडे यांची सुद्धा अशीच पार्श्वभूमी आहे. ते केवळ 1240 संस्थांचे चालक नाही तर उच्चशिक्षितही आहेत. त्यामुळे, चित्र स्पष्ट आहे, दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने जिंकतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी पुणे विधानपरिषद मतदारसंघाबाबत बोलून दाखवला.
चंद्रकांत पाटलांचं ट्रोलर्संना उत्तर
गोकुळ जसं होत तशी विधानसभा निवडणूक पण होतीच ना, लोकसभा झाल्यावर वाटल की 48 नाही मिळालं, 17 मिळाल्या. मात्र, विधानसभेला 237 जागा जिंकल्याचं उदाहरण चंद्रकांत पाटील यांनी दिलं. या निवडणुकांबाबत कोणी अंदाज व्यक्त करू शकत नाही, लोकशाही प्रगल्भ झाली आहे. गोकुळमध्ये असं वाटलं की, पाटील यांच्या स्टेटमेंटच्या चेष्टा करत आहेत. पण, राहुल गांधी पण म्हणतात की सगळ्या जागा जिंकणार, असे म्हणत राहुल गांधींचं उदाहरण देत चंद्रकांत पाटील यांनी ट्रोलर्संना सुनावलं. गिरणी कामगाराचा मुलगा राज्याच्या राजकारणात आला हे पटत नाही, मी काय कोणाला घाबरत नाही, आम्ही कोणाचे खातो? असेही पाटील यांनी म्हटलं.
विरोधकांचा पराभव होणार हे क्लियर झालं आहे, पराभवानंतर काय बोलायचं ह्याची आता उजळणी सुरू झाली आहे. काय होईल हे मतदारांवर सोडायचं असतं. कधी जय कधी पराजय, मात्र या वेळेस असं होणार नाही, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय.



