देवेंद्र फडणवीसांनी 25 किलो वजन 56व्या वर्षी कसं कमी केलं? त्यांच्या फिटनेसच्या सहज सुलभ गोष्टी सर्वांना शक्य 

0

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजकीय कारकीर्दीसोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि फिटनेस रुटीनमुळेही चर्चेत असतात. मात्र, एकेकाळी त्यांचे वजन तब्बल १२२ किलो झाले होते. वाढलेल्या वजनामुळे त्यांना चालणे, उठणे आणि बसणे यासारख्या दैनंदिन कामांमध्येही त्रास जाणवू लागला होता. त्यानंतर त्यांनी न्यूट्रिशनिस्टच्या सल्ल्याने आपल्या आहारात आणि जीवनशैलीत महत्त्वाचे बदल केले. या बदलांमुळे त्यांनी काही महिन्यांत सुमारे २५ किलो वजन कमी केले. आजही फिटनेस राखण्यासाठी ते काही ठरावीक सवयी पाळतात. जाणून घेऊया, देवेंद्र फडणवीस यांनी वजन कमी करण्यासाठी कोणते बदल केले आणि त्यांच्या फिटनेस रुटीनमध्ये कोणत्या सवयींचा समावेश आहे.

अधिक वाचा  पुणेकरांनो, उन्हाचा चटका आणखी वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज

दिवसातून तीन वेळा जेवण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्वी खाण्या-पिण्याच्या वेळांकडे फारसे लक्ष देत नव्हते. ते कधीही आणि काहीही खात असत. मात्र, वजन कमी करण्यासाठी त्यांनी आपल्या आहाराचे नियोजन केले आणि दिवसातून तीन वेळा जेवण्याची सवय लावून घेतली. त्यांच्या आहारात हिरव्या भाज्या, डाळी, भात, पोळी आणि सॅलड यांचा समावेश असतो. तसेच, प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांना आहारात अधिक महत्त्व देतात. यामध्ये पनीर, डाळी, चिकन आणि मासे यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. याशिवाय ते सूप आणि सॅलड सुद्धा जास्त खातात.

योगासने आणि झोपेचे योग्य नियोजन

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

फिट राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी योगासनांचा आधार घेतला. ते दररोज सुमारे एक तास योगासने करतात. यासोबतच ते नियमितपणे वॉक देखील करतात. योगासने आणि चालण्यामुळे त्यांना फिटनेस राखण्यास मदत होते. त्यांना पूर्वी पुरेशी झोप मिळत नव्हती. झोपेचे योग्य नियोजन करण्यासाठी त्यांनी श्वसनाशी संबंधित योग प्रकारांचा सराव सुरू केला. यामुळे त्यांच्या झोपेत सुधारणा झाली आणि त्यांना अधिक चांगले वाटू लागले.

जंक फूड आणि साखरेपासून दूर

वजन कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आहारातून बाहेरचे पदार्थ आणि जंक फूड वगळले. तसेच, त्यांनी पांढऱ्या साखरेचे सेवनही बंद केले. जंक फूड आणि साखरेचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्यांनी या पदार्थांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

अधिक वाचा  बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस? हवामान विभागाचा मोठा इशारा!

फिटनेससाठी सातत्य महत्त्वाचे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असे मत आहे की प्रत्येकाने फिट राहावे आणि फिटनेस टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणा आणि सातत्य आवश्यक आहे. योग्य आहार आणि शिस्तबद्ध दिनचर्या पाळल्यास फिट राहण्यास मदत होऊ शकते. निरोगी शरीरासोबतच मन प्रसन्न ठेवण्यासाठीही फिटनेस महत्त्वाचा आहे.