विजयादशमीला कोथरूडकरांना मराठी ‘रामलीला’ आणि भव्य ‘रावणदहन’ची पर्वणी; ‘कथा शौर्याची माझ्या श्रीरामाची’ नाट्यप्रयोगालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पुणे : विजयादशमीच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोथरूड सिटीझन फोरम आणि संकल्पसिद्धी हनुमान मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानावर रामलीला आणि रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दसऱ्याची पारंपरिक रावणदहनाची परंपरा जपत, लोकसेवक प्रशांत कनोजिया यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘कथा शौर्याची माझ्या श्रीरामाची’ या मराठी रामलीलेचा अनुभव कोथरूडकरांनी घेतला.

रामचरित्रावर आधारित या मराठी नाट्यप्रयोगाचे दिग्दर्शन राजेंद्र पालवे यांनी केले. मराठी भाषेतून रामायणातील शौर्य, भक्ती, संस्कार आणि आदर्शांचे दर्शन घडविणाऱ्या या सजीव नाट्यप्रयोगादरम्यान उपस्थित प्रेक्षक रामभजनात तल्लीन झाले होते. मराठी भाषेत रामलीला सादर करण्याच्या संकल्पनेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ मिळाले.

अधिक वाचा  पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, पुढील आठ महिन्यासाठी पालिकेचे आज कठोर निर्बंध,’या लोकांना पाणी वापरता येणार नाही…

या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्रा. पराग कालकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध रिलस्टार अथर्व सुदामे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस बाळासाहेब शेडगे, किशोर शिंदे, मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, माजी नगरसेविका पुष्पाताई कानोजिया, सुशीलाताई नेटके, नगरसेवक किरण दगडे, नगरसेविका अल्पनाताई वर्पे, प्रसिद्ध उद्योजक प्रवीण बढेकर
मनविसे शहराध्यक्ष धनंजय दळवी, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

भव्य रावणदहनासाठी रावणाची मूर्ती विनायक मुरुडकर आणि विक्रांत डाखवे यांनी साकारली. श्रीरामाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या रावणदहनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रशांत कनोजिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. पारंपरिक दसरा उत्सवाला मराठी भाषेतील रामलीलेची जोड देत, रामायणातील विचार आणि संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे निमंत्रक निलेश सैंदाणे, प्रसाद गोखले, हेमंत पासलकर यांनी आभार मानले.

अधिक वाचा  केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी