केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी

0

भारतात दसरा आणि दिवाळीच्या दरम्यान चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते सोने आणि चांदीची मागणी देशात वाढते. या पार्श्वभूमीवर भारत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. भारतात पुढील सहा महिन्यात चांदीच्या 6500 टन मेट्रिक टन आयातीला मंजुरी देण्यात आली आहे. सणांच्या काळात चांदीच्या मागणीची पूर्तता केली जावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या चार बुलियन व्यावसायिकांना आयातीची परवानगी मिळाली आहे, त्यांनीच ही माहिती दिल्याचं वृत्ता संस्था रॉयटर्सनं म्हटलं.

भारत जगातील चांदीचे सर्वाधिक ग्राहक असणाऱ्या देशांपैकी एक देश आहे. भारताला गरजेच्या 80 टक्के चांदी विदेशातून आयात करावी लागते. आयात वाढल्यानं देशात चांदी वाढू शकते, याचा दरांवर परिणाम होऊ शकतं.

अधिक वाचा  एकनाथ शिंदेंचं 500 कोटींच्या बॉम्बवरुन जरांगेंना प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल

बाजार विश्लेषकांच्या मते पुढील सहा महिन्यांसाठी चांदीच्या आयातीला मंजुरी मिळाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदी आयातीला मंजुरी मिळाल्यानं व्यावसायिकांमध्ये देखील आश्चर्य आहे. कारण चांदीचे दर घसरलेले आहेत, चांदीची मागणी देखील कमी आहे. चांदीचे दर घसरल्यानं लोक गुंतवणूक करत नसल्याचं चित्र आहे.

केंद्र सरकारनं मे महिन्यात चांदीच्या सर्व प्रकारच्या आयातीवर तात्काळ लागू होणारे निर्बंध घातले होती. त्यानंतर जूनमध्ये चांदीचे दाने आणि पाऊडरवर देखील निर्बंध घालण्यात आले. आयातीसाठी सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असं सांगण्यात आलं होतं.