पुणे शिक्षक मतदारसंघ मोठा ट्विस्ट गावडेंची उमेदवारी रद्द? विरोधक खंडपीठात याचिका करणार अचानक काय घडलं?

0

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपकडून पदवीधर मतदारसंघात डॉ. स्मिता जाधव यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे. तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे.भाजपच्या दोन्ही उमेदवारांसाठी बैठका सुरू आहेत. भाजपचे वरिष्ठ नेतेही प्रचारासाठी सर्वत्र फिरत आहे. विविध संघटनांचा पाठिंबा मिळवत आहेत. त्याचदरम्यान शिक्षक मतदारसंघात भाजपच्या अडचणीत वाढ झाली आहे. विरोधी पक्षातील नेते कौस्तुभ गावडे यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.

जाणून घ्या नेमकं काय घडलं?

पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. शिंदे गटाने स्वतंत्र उमेदवार दिल्यानंतर आता भाजप उमेदवार कौस्तुभ गावडे अडचणीत सापडले आहेत. कौस्तुभ गावडे यांचे वय 29…तर निवडणूक लढवण्यासाठी 30 वर्षाची पात्रता आहे, असा दावा विरोधकांनी केला आहे. मतदारयादीत त्यांचं वय 29 आहे. तर आयोगाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात गावडे यांनी वय 30 वर्षे दाखवले आहे. त्यामुळे कौस्तुभ गावडे यांच्या विरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल केली जाणार आहे. कौस्तुभ गावडे यांची उमेदवारी रद्द करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात याचिका केली जाणार आहे. निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याचा कौस्तुभ गावडेंवर आरोप करण्यात आला आहे. पुणे मतदारसंघातील न्यू रासपचे उमेदवार प्रा. राघू तथा आर.वाय घुटुकडे न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत .

अधिक वाचा  विधान परिषद 5 जागांसाठी आज मतदान 182 उमेदवार रिंगणात; सर्वत्र बंडखोरीची धास्ती पण ‘मैत्रीपूर्ण’ लढतचा मुलामा!

महायुतीत अंतर्गत कलह चव्हाट्यावर

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यात महायुतीमधील अंतर्गत कलह पूर्णपणे चव्हाट्यावर आलाय. महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांना राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी अद्याप स्पष्ट पाठिंबा दिलेला नाही. साताऱ्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्याला मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार धैर्यशील कदम यांनी अनुपस्थिती दर्शवल्यामुळे आणि उदयनराजे भोसले यांनी मेळाव्याला उपस्थित राहूनही बोलणे टाळल्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाल्याचे बोलले जात आहे. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं आहे. महायुतीमधील या समन्वयाच्या अभावाचा आणि विसंवादाचा थेट फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार