टायगर श्रॉफवर गोळीबार करणारे हल्लेखोर कुठे झाले पसार? CCTV फुटेजमध्ये दिसले २ संशयित

0

जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी वेगाने सुरू केला आहे. या प्रकरणातील ३ हल्लेखोरांनी गोळीबारानंतर दुचाकी अंधेरी रेल्वे स्टेशनला सोडून फरार झाले आहेत. पोलिसांनी हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली दुचाकी जप्त केली आहे.

जुहू पोलीस स्टेशनला या घटनेबाबत ३ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरुवातीच्या तपासात या दुचाकीची मुंबईत नोंदणी आहे. पोलीस आता नंबर प्लेट आणि चेसिस इंजिनच्या माध्यमातून वाहनाचा रेकॉर्ड तपासत आहे. घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. ज्यात आरोपींची हालचाल रेकॉर्ड झाली आहे. टायगर श्रॉफच्या कारवर हल्ला करणाऱ्या २ हल्लेखोरांची ओळख पटली आहे. दोघेही सफेद शर्ट घातल्याचे दिसून येते.

अधिक वाचा  राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदल येथे ‘अवकाळी’ची शक्यता; दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आसुसलेल्या आशा पालवल्या

“हल्लेखोर अर्धा तास थांबलेले, टायगर ज्या बाजूला बसला होता तिथेच गोळ्या झाडल्या अन्…”रविवारी फुटबॉलच्या सामन्यावरून परत येत असताना टायगर श्रॉफच्या कारवर हल्लेखोरांनी पाच गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून टायगर थोडक्यात बचावला, मात्र त्याचा चालक जखमी झाला. या प्रकरणात एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेनंतर अनेक प्रत्यक्षदर्शींनी घटनाक्रम सांगितला आहे. घटनास्थळाजवळ असलेल्या वडापाव स्टॉलवर हल्लेखोर अर्धा तास थांबले होते. हल्लेखोरांनी टायगर श्रॉफवर गोळ्या झाडल्या आणि तिथून पसार झाले. गोळी झाडताच टायगर श्रॉफ कारमध्ये खाली वाकला, त्यामुळे तो बचावला. त्यांच्या कारमध्ये तिघे जण होते. जखमी वाहनचालकाला मागील बाजूस बसवल्यानंतर टायगर श्रॉफ स्वत: कार चालवून हॉस्पिटलला गेला असं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

कुणालाही सोडणार नाही – एकनाथ शिंदे

दरम्यान, मुंबईत कोणत्याही टोळीला किंवा व्यक्तीला दहशत आणि गुंडगिरी करण्यास परवानगी दिली जाणार नाही. कोणालाही सोडले जाणार नाही. राज्य सरकार आणि पोलीस गुन्हेगारांवर कारवाई करतील. कुणालाही धमकीचे कोणतेही फोन आल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कलाकारांना केले.