केंद्रीय मंत्र्याचा कार्यकाळ संपण्याआधी राजीनामा, ५ महिन्यात तिघांनी पद सोडलं; दोघांना तिकीट नाकारलं सरकारचा प्लान काय?

0

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी केंद्रीय मंत्रिपदासह राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चांना उधाण आलंय..याच महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकार किंवा भाजपकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

एल. मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 5 पानी पत्र पाठवून राजीनामा दिला आहे. तामिळनाडूमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आपल्याला पूर्ण वेळ काम करायचे असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तामिळनाडूतील गावागावात आणि कार्यकर्त्यांमध्ये जाऊन २०२९च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याची इच्छा मुरूगन यांनी व्यक्त केली आहे.मुरुगन हे मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून आले होते. सप्टेंबर २०२१ पासून ते राज्यसभेचे सदस्य होते आणि एप्रिल २०२४ मध्ये त्यांची पुन्हा निवड झाली होती. त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ २०३० पर्यंत होता. मात्र, तामिळनाडूमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी त्यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

मुरुगन यांच्या आधीही काही केंद्रीय मंत्र्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंह बिट्टू यांनीही मंत्रिपद सोडले आहे. त्याचबरोबर हरदीप सिंह पुरी आणि बी. एल. वर्मा यांना राज्यसभेसाठी पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंत्रिमंडळातील आणखी काही पदे रिक्त होण्याची शक्यता आहे.पाच महिन्यात तीन मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सध्या काही मंत्र्यांकडे एकापेक्षा जास्त मंत्रालयांचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे रिक्त पदांवर नव्या चेहऱ्यांना संधी देऊन मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जाऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अधिक वाचा  शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी