केंद्रीय मंत्रिपदासह खासदारकीचा राजीनामा पंतप्रधानांही पाठवले पत्र; आता संपूर्ण वेळ मला परत ते काम करायचेय त्याला प्राधान्य

0

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्रीय मंत्रि‍पदाबरोबरच मुरुगन यांनी राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आपला राजीनामा पाठवला. त्यांनी त्यांची भूमिका पत्रात मांडली आहे.

केंद्रीय मंत्री मुरुगन यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले असून, राजीनामा देण्याचे कारणही सांगितले आहे. मला आता संपूर्ण वेळ तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी द्यायचा आहे आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करायची आहे, असेही ते म्हणाले आहेत.

मला परत ते काम करायचे आहे, त्याला माझे प्राधान्य

अधिक वाचा  दुसरी पसंती ठरवणार पुण्याचा शिक्षक आमदार, नेमकं गणित काय? निकालाआधीच सोप्या शब्दात समजून घ्या

मुरुगन यांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, पाच वर्षे केंद्र सरकारमध्ये काम करणे माझ्यासाठी एक मोठा सन्मानाची गोष्ट होती. आता मला तेच काम करण्यासाठी परत जायचे आहे, ज्याने मला सार्वजनिक जीवनात काम करण्यासाठी प्रेरित केले. तामिळनाडूमध्ये भाजपाला मजबूत करायचे आहे आणि राज्यात २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काम करायचे आहे. मी कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येत नाही. माझे आईवडिल हे मजूर म्हणून काम करायचे आणि गुरे चारण्याचे काम करायचे. आजही माझे कुटुंब तामिळनाडूतील कोनूर गावांत सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगत आहेत. माझ्या आईवडिलांनी कधी कल्पनाही केली नव्हती की मी केंद्रात मंत्री होईल, असेही मुरुगन यांनी म्हटले आहे.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

आधी अभावि आणि नंतर भाजपासाठी काम

मुरुगन यांनी म्हटले आहे की, माझ्या राजकीय प्रवासाचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला आणि भाजपाच्या परंपरेला आहे. गावपातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपाकडून पुढे जाण्याची संधी दिली जाते. मी महाविद्यालयात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडला गेलो. तीन दशके अभाविचे आणि नंतर भाजपाचे काम केले. प्रथम देश, नंतर पक्ष आणि सर्वात शेवटी स्वत हेच माझे जगण्याचे ध्येय राहिले आहे, असेही मुरुगन यांनी म्हटले आहे.