विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत नवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करीत उद्योगक्षेत्राकडे वळले पाहिजे: डॉ. हर्षदीप कांबळे

0

मुंबई दि. १२ (रामदास धो गमरे) “शासकीय नोकऱ्या या आता दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत प्रायव्हेट नोकऱ्या जास्त आहेत त्यामुळे केवळ शिक्षण असून फायदा नाही तर शिक्षणासोबतच नवनवीन टेक्नॉलॉजी आत्मसात करीत छोट्या-छोट्या लघु उद्योगाकडे आपण वळल पाहिजे, त्याकाळी मेरीट मध्ये येण्याची माझी परिस्थिती नव्हती, परंतु मी डॉक्टर आणि मोठ्या भावाने इंजिनिअर व्हावं ही माझ्या आईची इच्छा होती त्याप्रमाणे मी डॉक्टर तर माझा भाऊ इंजिनिअर होऊन तो सध्या परदेशात स्थायिक झाला आहे, मी ही आईच्या इच्छेनुसार वैद्यकीय क्षेत्रात सेवा केली, परंतु माझे वरिष्ठ डॉक्टर म्हणाले की तू ही नोकरी सोड आणि आपल्या करिअरकडे व्यावसायिक संधी म्हणून बघ मी तुला मदत करेल त्याप्रमाणे ते मला प्रतिमहिना ठराविक पैसे देत त्यातून मी अभ्यास करून UPSC परीक्षा पास झालो आणि त्यामुळे मी इथवर येऊन पोहोचलो, या पदव्या संपादित करण्यासाठी मला मदत झाली पण त्यामागे माझी देखील जिद्द, मेहनत आणि चिकाटी होती, आपण देखील अशी मेहनत घेतली तर तुम्ही पण मोठ्या पदावर पोहोचू शकाल.

बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला आणि धम्मासोबत दान आणि कुशल कर्म करण्याची शिकवण दिली आपण त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे, मी आज उच्चपदस्थ असल्याने आज आपल्या अधिकाराचा वापर करून शासकीय फायदा घेत आपल्या स्मारकासाठी पाच कोटी वरील रक्कम मंजूर करून त्याचा जीआर काढण्याचा मला संधी मिळाली, बाबासाहेबांनी महाड क्रांतीभूमीत पाण्यासाठी क्रांती केली सोबतच काळाराम मंदिर, येवला, काठमांडू या ठिकाणी अनेक क्रांती केल्या आणि शेवटी दीक्षाभूमीवर त्यांनी आपल्याला धम्मदीक्षा दिली, महाड क्रांतीभूमी ते दीक्षाभूमी अशा बाबासाहेबांच्या कार्याचे चिंतन केले तर बाबासाहेबांनी किती कष्ट केले हे आपल्या लक्षात येईल म्हणून आपण शिकलो, नोकरी भेटली, आपल्याला आपले अधिकार प्राप्त झाले तर आपण त्याचा दुरुपयोग न करता आपल्याला मिळालेले अधिकार यथाशक्ती आपल्या समाजाच्या उद्धारासाठी कसे वापरू याचा विचार केला पाहिजे म्हणून मिळालेल्या संधीचे सोने केले पाहिजे यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने शिक्षणासोबत नवनवीन टेक्नॉलॉजी शिकून छोटे-मोठे उद्योग सुरू करुन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.” असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय चे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात प्रमुख वक्ते या नात्याने बोलत असताना केले.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

बौद्धजन पंचायत समिती संलग्न शिक्षण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च-एप्रिल २०२६ या शैक्षणिक वर्षामध्ये १० वी, १२ वी परीक्षांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या तसेच विविध विषयांत प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ रविवार दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ५:०० वाजता सभापती आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे आयोजित करण्यात आला होता.

अध्यक्षीय भाषणात बोलत असताना सभापती आनंदराज आंबेडकर यांनी “आपल्या समजातील मुली या उच्च पदवीधर आणि उच्च शिक्षित आहेत परंतु मुले मात्र शैक्षणिक पातळीवर उंच भरारी घेतलेली दिसत नाही याचे कारण आपण मुलांचे अतिलाड करतो त्यामुळे मुले कधी कधी हाताबाहेर जातात परंतु आता आपण त्यांचे लाड कमी करून त्यांना शैक्षणिक क्षेत्रातही सबळ केले पाहिजे, सध्या विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे त्याठिकाणी मी गेलो होतो तर त्याठिकाणी मला कोकणातील एकही मुलगा दिसला नाही ही शोकांतिका आहे.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

यातूनच कोकणातील आपली मुले शैक्षणिक दृष्ट्या किती मागास आहेत हे दिसून येते, म्हणून आपण आता शिकले पाहिजे तरच आपण उज्ज्वल भविष्य घडवू शकतो, याठिकाणी डॉ. हर्षदीप कांबळे यांनी विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगत भविष्यात विद्यार्थ्यांनी काय करायला हवे याचे उत्तम असे मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमी आहे आणि विद्यार्थ्यांनीही त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ध्येय आणि चिकटी धरून पुढे गेले पाहिजे.” असे नमूद केले.

सदर गुणगौरव कार्यक्रमास जवळपास दोनशे विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते, डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या शुभहस्ते ९१% ते ९८% गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांचा गुणगौरव करुन त्यांना सन्मानित करण्यात आले, त्याचबरोबर ६०% हून अधिक टक्केवारी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सभापती आनंदराज आंबेडकर, डॉ. हर्षदीप कांबळे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले.

अधिक वाचा  पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ चंद्रकांतदादांचा पुण्यातही घरोघरी प्रचार; महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयीचा निर्धार

सदर प्रसंगी उपसभापती विनोद मोरे, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार यांनीही आपले मौलिक विचार मांडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राजेश घाडगे, राजेश पवार, अशोक मोहिते, लवेश तांबे यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत केले.

सदर कार्यक्रमास सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय चे माजी महासचिव दिनेश डिंगळे, कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष एच. आर. पवार, अशोक कांबळे, मनोहर सखाराम मोरे, चंद्रमणी तांबे, खजिनदार नागसेन गमरे, अतिरिक्त चिटणीस यशवंत कदम, भगवान तांबे, श्रीधर जाधव, अनिरुद्ध जाधव, संदेश खैरे, महेंद्र पवार, विवाह मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, भागुराम सकपाळ, सुरेश मंचेकर, तुळशीराम शिर्के, माजी चिटणीस प्रकाश कासे आदी मान्यवर, विविध शाखांचे पदाधिकारी, सभासद, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यसम्राट कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांनी आभार प्रदर्शन करीत असताना महाड क्रांतीभूमी चवदार सत्याग्रहात बौद्धजन पंचायत समितीचा असलेला सिंहाचा वाटप आणि पंचायत मधील पंच शब्द शाक्य कुळाचा असलेला संबंध यावर सविस्तर मार्गदर्शन करुन सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.