कोथरूड भाजपाचे उमेदवारीचे चित्र पूर्ण; ‘अण्णा’चा कणा मजबूत

0

पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने सर्वाधिक चर्चेचा असलेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या अधिकृत उमेदवारांची निश्चिती केली आहे. कोणत्याही प्रकारचे जाहीर प्रकटन न करता प्रत्यक्ष उमेदवारांना फोन करून उमेदवारी अर्ज भरण्याची सूचना देण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आला. त्यानुसार कोथरूड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी निश्चित करताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व राज्यसभा खासदार मी मेधाताई कुलकर्णी यांच्या तिहेरी दावेदारीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारली आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये आपली छाप सोडत असून सर्वत्र अण्णा समर्थक उमेदवारांना संधी मिळाल्यामुळे कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये मुरलीधर मोहोळ यांचा कणा मजबूत झाला आहे.

अधिक वाचा  भाजपाचे पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी पुण्यावर विशेष लक्ष; कारवाईच्या भीतीने नगरसेवकांचा मतदारांशी संपर्क?

कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकारणी बांधणी असेल किंवा अन्य काही उपक्रमांची अंमलबजावणी करण्यामध्ये आग्रही असणाऱ्या चंद्रकांत दादा पाटील यांच्या नशिबी मात्र काही निवडकच उमेदवारांना संधी शक्य झाली. त्यातच बाहेरील आयात उमेदवारांना मार्फत मुरलीधर मोहोळ यांनी आपले नातेवाईक व हितसंबंधातील सगेसोयरे यांच्यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये सुरक्षित जागा देण्यात यश मिळवले आहे. एकंदरीत कोथरूड विधानसभा मतदारसंघांमध्ये चंद्रकांत दादा पाटील व मेधा कुलकर्णी यांच्या हाताला समाधानकारक यश आलेले दिसत नाही. कोथरूड विधानसभा मतदारसंघात शेजारील खडकवासला मतदारसंघांमध्येही केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपली छाप सोडत सलग चौथ्यांदा विजयी झालेल्या आमदार भीमराव अण्णा तापकीर यांचाही करेक्ट कार्यक्रम केला असून प्रत्येक प्रभागात तग धरण्यापूर्ती एक उमेदवारी अशी संरचना करून आपले प्राबल्य वाढवले आहे.

अधिक वाचा  बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस? हवामान विभागाचा मोठा इशारा!

भाजपा आज यांची अधिकृत उमेदवारी जाहीर- 

प्रभाग 9 : सुस बाणेर पाषाण 

अमोल बालवडकर, गणेश कळमकर, मयुरी राहुल कोकाटे, रोहिणी चिमटे

प्रभाग 10 : बावधन- भुसारी

किरण दगडे, दिलीप वेडे, अल्पना गणेश वर्पे, रूपाली सचिन पवार

प्रभाग 11 : रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगर

अजय मारणे, शर्मिला नितीन शिंदे, अभिजित राऊत

प्रभाग 29 : डेक्कन जिमखाना- हॅप्पी कॉलनी

मिताली कुलदीप साळवेकर, पुनीत जोशी, सुनील पांडे, मंजुश्री खर्डेकर

प्रभाग 30: कर्वेनगर -हिंगणे होम कॉलनी 

राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, तेजश्री महेश पवळे, रेश्मा संतोष बराटे

प्रभाग 31 : मयुर कॉलनी- कोथरूड 

अधिक वाचा  शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी

पृथ्वीराज सुतार, निलेश कोंढाळकर, वासंती जाधव, हर्षाली माथवड

प्रभाग 32 : वारजे – पॉप्युलरनगर 

भारतभूषण बराटे, सायली वांजळे, सचिन दोडके, हर्षदा शंतनु भोसले

प्रभाग क्रमांक ३३ शिवणे खडकवासला धायरी पार्ट

सुभाष नाणेकर, किशोर पोकळे, ह.भ.प ममता सचिन दांगट, सौ. धनश्री दत्ता कोल्हे

प्रभाग क्रमांक ३४ नर्हे वडगाव बुद्रूक धायरी

हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे ,जयश्री भूमकर, कोमल नवले

प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी माणिकबाग

ज्योती गोसावी, श्रीकांत जगताप, सचिन मोरे, मंजुषा नागपुरे