पुणे जिल्ह्यात भाजपच ठरलं! कुठे दादांना साथ आणि कुठ विरोधात; मुरलीधर मोहोळांनी सांगितली रणनिती

0

नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकाबाबतची महायुतीची बोलणी जवळपास निश्चित झाली आहे. पुणे जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आमने-सामने येत असल्याचे पाहायला मिळत आहे.तर काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन भाजपला आव्हान देणार असल्याच्या देखील चर्चा सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये युती बाबतचा अंतिम निर्णय झाला आहे. तर काही ठिकाणी हे दोन्ही पक्ष वेगळे लढणार हे निश्चित करण्यात आले आहे. याबाबत केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार तसेच ज्यांच्यावर पुणे जिल्ह्यातील निवडणुकांची प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेले मुरलीधर मोहोळ यांनी याबाबतचे गणित सांगितले आहे.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांना संभाव्य दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत विचारले असता मोहोळ म्हणाले, ‘स्थानिक पातळीच्या निवडणुकांसाठी वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक नेत्यांना मोकळीक दिलेली आहे. आमच्या पक्ष नेतृत्वाने देखील आम्हाला सांगितला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढायचे असले तरी काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जर कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळाची असेल तर त्या पद्धतीचा निर्णय घेण्याची मुभा स्थानिक नेत्यांना देण्यात आली आहे. यामुळे राज्यातील महायुती वर मात्र कोणताही परिणाम होणार नाही.’

पुणे महापालिकेमध्ये स्वबळावरची निवडणूक लढावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र, अद्याप महापालिकेच्या निवडणुकींना उशीर आहे. मात्र जेव्हा केव्हा निर्णय घेतला जाईल, तेव्हा कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊनच निर्णय घेतला जाणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

नगरपंचायतींचा विचार केला तर पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी आम्ही युती करत आहोत तर काही ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवत आहोत. तळेगावमध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत आहोत तर लोणावळ्यामध्ये वेगवेगळे निवडणूक लढवत आहोत, त्यासोबतच सासवड नगरपालिका, फुरसुंगी नगरपालिका आणि जेजुरी नगरपरिषदेमध्ये वेगळे लढत आहोत. मात्र, इंदापूरमध्ये आम्ही युती करून लढण्याचा विचार आहे. मात्र शिरूर आणि भोरमध्ये देखील स्थानिक नेतृत्वाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मोहोळ यांनी दिली.

एकूणच पुणे जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांचा विचार केल्यास काही बोटावर मोजणे इतक्या नगरपालिका सोडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष वेगळेच लढताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येताना पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अधिक वाचा  केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी