११ वर्षांची जनसेवेची परंपरा यंदाही अखंड; किरण दगडेपाटील यांनी ७ हजार कुटुंबांत दिवाळीचा आनंद फुलवला

कोथरूड-बावधनमधील प्रभाग क्रमांक १० मध्ये मोफत दिवाळी किराणा साहित्य वाटप; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

0

पुणे: गेल्या ११ वर्षांपासून सातत्याने जपलेली जनसेवेची परंपरा यंदाही अखंड सुरू ठेवत प्रभाग क्रमांक १०, कोथरूड-बावधन परिसरातील तब्बल ७ हजार कुटुंबांमध्ये दिवाळीचा आनंद फुलविण्याचा उपक्रम नगरसेवक किरण दगडेपाटील यांच्या वतीने राबविण्यात आला. दिवाळी प्रत्येकाच्या घरात आनंद घेऊन यावी, प्रत्येक कुटुंबाचा सण गोड व्हावा आणि समाजातील सर्व घटकांना सणाचा उत्साह अनुभवता यावा, या सामाजिक भावनेतून मोफत दिवाळी किराणा साहित्य वाटपाचे आयोजन करण्यात आले होते.

गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमाने यंदाही जनसेवेचा आदर्श अधोरेखित केला. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना किराणा साहित्याचे वाटप करून त्यांच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत सणाचा आनंद पोहोचावा, हीच या उपक्रमामागील प्रमुख भूमिका असल्याचे किरण दगडेपाटील यांनी सांगितले.

अधिक वाचा  तुकाराम मुंढे यांना मोठा झटका थेट एफडीएचा हा आदेश रोखला; पुण्यातील रांजणगावची ही राजाश्रयाची कंपनी ठरली कारणीभूत

७ हजार कुटुंबांपर्यंत आनंदाचा दीप पोहोचला

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. मात्र, प्रत्येक कुटुंबाला सण साजरा करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. प्रभागातील तब्बल ७ हजार कुटुंबांना मोफत दिवाळी किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. साहित्य वाटपावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान आणि आनंद हीच या सामाजिक उपक्रमाची खरी पावती ठरली. नागरिकांच्या आनंदात सहभागी होता आले, त्यांच्या घरात दिवाळीचा गोडवा निर्माण करता आला, याचे मोठे आत्मिक समाधान असल्याची भावना किरण दगडेपाटील यांनी व्यक्त केली.

अधिक वाचा  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रिम मदत! कोणाला पैसे, कोण वंचित निकष काय? सविस्तर वाचा

मान्यवरांच्या उपस्थितीत आनंदसोहळा

या दिवाळी किराणा साहित्य वाटप सोहळ्याला राज्याच्या उपमुख्यमंत्री सौ. अमृताताई देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधरअण्णा मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील, आमदार मा. श्री. भीमरावअण्णा तपकीर, अभिनेत्री सौ. स्नेहलताई तरडे, मा. श्री. बबनराव (दादा) दगडे पाटील, नगरसेवक श्री. पृथ्वीराज सुतार, नगरसेविका सौ. अल्पना वरपे, नगरसेवक श्री. दिनेश माथवड, नगरसेविका सौ. ज्योत्स्ना कुलकर्णी यांच्यासह विविध नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उत्साह लाभला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

जनसेवेचा प्रवास अखंड सुरू राहणार

अधिक वाचा  ‘सुप्रीम’आदेश तरी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकांना पुन्हा ब्रेक? तीन मोठी कारणं समोर? या घटनात्मक मर्यादा मात्र बंधनकारक

“गेल्या ११ वर्षांपासून जपलेली जनसेवेची परंपरा यंदाही अखंड सुरू ठेवता आली. प्रभागातील ७ हजार कुटुंबांसोबत दिवाळीचा आनंद वाटता आला, त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहता आले, हेच माझ्यासाठी सर्वात मोठे आत्मिक समाधान आहे. या उपक्रमाला उपस्थित राहून प्रोत्साहन देणाऱ्या सर्व मान्यवरांचे तसेच भरभरून प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे मनःपूर्वक आभार. जनसेवेचा हा प्रवास यापुढेही असाच अखंड सुरू राहील,” अशी भावना किरण दगडेपाटील यांनी व्यक्त केली.

सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम कोथरूड-बावधन परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरला. दिवाळीच्या आनंदात सर्वांना सहभागी करून घेणाऱ्या या जनसेवी परंपरेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.