सातारा जिल्हा बँकेत जयकुमार गोरे सुस्साट तर कुणी 4 मतांनी विजयी; एक मतपत्रिका बाद झाल्याने भवितव्य ईश्वर चिट्टीवर

0

संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. या निवडणुकीत कुणी अवघ्या 4 मतांनी निवडून आलंय. कुणाचं भवितव्य ईश्वर चिठ्ठीने ठरणार आहे.तर कुणाला शून्य मते मिळाल्याने धक्का बसला आहे. या निवडणुकीनंतर काहींचा जल्लोष सुरू झाला आहे. तर काहींच्या चेहऱ्यावर निराशा पसरली आहे. हा निकाल काहींसाठी आशेचा किरण घेऊन आला आहे. तर काहींची अवस्था आता पुढच्या निवडणुकीपर्यंत पर्याय नाही, अशी झाली आहे.

कोरेगावात चिठ्ठी फाटली

कोरेगाव तालुका सोसायटी मतदारसंघामध्ये चिठ्ठी फाटल्याने मोठा ट्विस्ट आला आहे. राष्ट्रवादीचे सुनील माने यांना 44 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या सुनील खत्री यांनाही 44 मते मिळाल्याने टाय झाला आहे. यावेळी एक फाटलेली चिठ्ठी बाजूला ठेवल्याने ट्विस्ट आला आहे. एक मतपत्रिका बाद झाल्याने दोघांचे भवितव्य आता ईश्वर चिट्टीवर ठरणार आहे.

अधिक वाचा  ११ वर्षांची जनसेवेची परंपरा यंदाही अखंड; किरण दगडेपाटील यांनी ७ हजार कुटुंबांत दिवाळीचा आनंद फुलवला

जावळी सोसायटीत अवघे आठ मते

जावळी सोसायटीची निवडणूक अत्यंत रंजक ठरली. राष्ट्रवादीच्या विठ्ठल गोळे यांना केवळ 8 मते मिळाली. तर भाजपच्या ज्ञानेश्वर रांजणे यांना 38 मते मिळाली. रांजणे हे 30 मतांनी विजयी झाले आहेत.

खंडाळा सोसायटीत शून्य मते

खंडाळा सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या अजय भोसले यांना 28 मते, भाजपच्या संजीव गाढवे यांना 21 मते आणि अपक्ष शामराव गाढवे यांना शून्य मते मिळाली आहेत. धक्कादायक म्हणजे शामराव गाढवे यांना त्यांचंही मत मिळालेलं नाही.

चार मतांनी विजय

महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीच्या रुपाली राजपुरे यांनी 8 मते मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या संजय मोरे यांना केवळ चार मते मिळाली आहेत. या अटीतटीच्या लढाईत रुपाली राजपुरे या अवघ्या चार मतांनी विजयी झाल्या आहेत.

अधिक वाचा  पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त)च्या वतीने “कंत्राटी सफाई कामगारांचा आक्रोश मोर्चा”!

शंभुराज देसाई विजयी

पाटण सोसायटी मतदारसंघात शिवसेनेचे शंभुराज देसाई विजयी झाले आहेत. त्यांना 58 मते मिळाली आहेत. तर भाजपचे सत्यजित पाटणकर यांना 46 मते मिळाली आहेत.

जयकुमार गोरे सुस्साट

मान सोसायटी मतदारसंघात भाजपचे जयकुमार गोरे 53 मते घेऊन जिंकले आहेत. राष्ट्रवादीचे मनोज पोळ यांना 14 तर शिवसेनेच्या शेखर गोरे यांना 7 मते मिळाली आहेत.