गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

0

गोकुळ मध्ये झालेल्या पराभवाची विचारमंथन करण्यासाठी आलेल्या बैठकीत महायुतीच्या सर्व नेत्यांनी झालं गेलं विसरून अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा संघर्ष निर्माण करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. येत्या 29 ऑक्टोबरलां गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षाची निवड होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळच्या निवडणुकीतील विजयी-पराभूतांची जबाबदारी घेण्यासाठी महायुतीच्या नेत्यांची जिल्हा बॅंकेत बैठक झाली. तर २८ ऑक्टोबरला पुढील राजकारणासाठी सर्व संचालक आणि नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. त्यामुळे पुन्हा संघर्ष असणार की समन्व्यय साधला जाणार हे पाहणे महत्वाचे आहे.

जिल्हा बॅंकेत प्रमुख नेत्यांची बैठक झाल्यानंतर पालकमंत्री आबिटकर यांनी बैठकीतील माहिती दिली. पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘चुरशीने झालेल्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. निकाल रात्री उशिरा लागल्यामुळे विजयी आणि पराभूतांना भेटता आले नाही. त्यामुळे आज सर्वांची एकत्रित बैठक घेतली आहे. पराभव झालेल्यांचीही जबाबदारी आमची आहे. दोषदुरुस्ती करून आम्ही पुन्हा एकसंध पुढील राजकारणासाठी तयार झालो आहोत. विजय झाल्यावर अनेक जण पुढे येतात, पण पराभव झाल्यावर इतरांवर खापर फोडतात. मात्र, दूध उत्पादकांचा कौल आता मान्य केला आहे. आता पुढील राजकारणासाठी सर्वांना एकसंध ठेवणे. विजयी, पराभूतांची जबाबदारी स्वीकारण्यासाठी आजची बैठक झाली. दूध उत्पादकांनी दिलेला कौल आहे. आम्ही अनेक ऊन-पावसाळे पाहिले आहेत. त्यामुळे आमच्यात वाद होण्याचा प्रश्‍नच येत नाही,’ असंही यावेळी आबिटकर म्हणाले.

अधिक वाचा  शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी

या बैठकीला विशेष म्हणजे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील, माजी संचालिका शौमिका महाडिक, नूतन संचालक राहुल पाटील आणि चेतन नरके, संजय घाटगे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील उपस्थित होते.

शौमिका महाडीक म्हणाल्या, विजय डोक्यात घ्यायचा नसतो, तसाच पराभव मनाला लावून घ्यायचा नसतो. मतदारांचा कौल आम्हाला मान्य आहे. जय-पराजयाची तयारी होती. पण निकाल अनपेक्षित होता, हे सत्य आहे. कोणीही कोठेही कमी पडले नाही, ‘लक फॅक्टर’ आहे. स्वाभिमान कोठे जिंकला, हेच कळत नाही. प्रतिष्ठीत घराणे म्हणून मतदान केले नाही, तर काय पाहून मतदान झाले, हे कोडे मलाही उलघडले नाही”

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज