पतित पावन संघटनेच्या पुणे शहर कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर

0

पुणे : पतित पावन संघटनेच्या पुणे शहर कार्यकारिणीमध्ये संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे वाढविण्यासाठी तसेच संघटनेची विचारधारा समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध पदांवर नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.

या निवडीनुसार पुणे शहर संपर्क प्रमुखपदी श्री. मुकुंद चव्हाण, पुणे शहर संघटकपदी श्री. मिलिंद तिकोने आणि पुणे शहर चिटणीसपदी श्री. गणेश बिबवे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच शहर कार्यकारिणी सदस्यपदी श्री. यादव पुजारी आणि श्री. प्रवीण ठाकूर यांची निवड करण्यात आली आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संघटनेचे संघटनात्मक कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. समाजातील विविध प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन जनहिताच्या कार्याला प्राधान्य देणे, युवकांना संघटनेशी जोडणे आणि संघटनेचे कार्य पुणे शहरात अधिक व्यापक करणे, यासाठी नवनियुक्त पदाधिकारी प्रयत्नशील राहतील.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.