केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचं बजेट मांडणार; या 10 मोठ्या घोषणा करु शकतात?

0

देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प आज संसदेत सादर केला जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून आज मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागल्या आहेत. निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा प्रथमच अर्थसंकल्प रविवारच्या दिवशी सादर होणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण राष्ट्रपतींची भेट घेतील आणि त्यानंतर सकाळी सव्वा दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेटची बैठक होईल. या बैठकीत अर्थसंकल्पाला मंजुरी मिळेल आणि त्यानंतर सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील. आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी वाढीव तरतुदी जाहीर होण्याची शक्यता आहेत. यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, पीक विमा योजना आणि सिंचन प्रकल्पांसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सोबतच नोकरदार आणि व्यापाऱ्यांना कररचनेत कोणतं गिफ्ट मिळणार का, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  एसएनडीटी मेट्रो स्टेशन वाहतूक कोंडी मुक्त? ‘या शासकीय जागेचा वापर करा’ पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी

अर्थसंकल्पाकडून सामान्य माणसाच्या काय अपेक्षा?

आज सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026 बद्दल व्यापारी समुदायापासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांमध्ये मोठा उत्साह आणि आशा आहे. समाजातील कमकुवत आणि वंचित घटकांना सक्षम बनवण्याची आशा व्यक्त केली जात असतानाच, महागाई, कर सुलभीकरण आणि व्यवसायात दिलासा यासारखे मुद्देही ठळकपणे समोर येत आहेत. अर्थसंकल्पाबाबत सामान्य जनतेनेही मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. या अर्थसंकल्पामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अन्नधान्याच्या किंमती नियंत्रित करण्यासाठी आणि महागाई कमी करण्यासाठीच्या उपाययोजनांचा थेट फायदा निम्न आणि मध्यम वर्गाला होईल, असेही त्यांनी सांगितले.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

कसे असेल बजेट?

  • स्टँडर्ड डिडक्शन 75 हजार रु.वरुन 1 लाख रु. शक्य
  • ‘जॉइंट इन्कम टॅक्स रिटर्न फाइल’ घोषणा शक्य
  • नव्या आयकर प्रणालीतही मिळू शकते 80-डी ची सवलत
  • जुनी आयकर प्रणाली होऊ शकते रद्द
  • 30% चा आयकर स्लॅब बदलण्याची शक्यता
  • गृहकर्जदारांना व्याजदरातून मिळू शकतो दिलासा
  • निवडणुका होणाऱ्या राज्यांसाठी असू शकते खास गिफ्ट
  • किसान सन्मान निधीची रक्कद 6 वरुन 9 हजार होण्याची शक्यता
  • ‘आयुष्मान भारत’ची वयोमर्यादा 70 वरुन 60 पर्यंत होऊ शकते कमी
  • 300 नव्या अमृत भारत आणि वंदे भारत रेल्वे गाड्यांची घोषणा शक्य
  • पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठ्या घोषणेची शक्यता
अधिक वाचा  भाजपाचे पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी पुण्यावर विशेष लक्ष; कारवाईच्या भीतीने नगरसेवकांचा मतदारांशी संपर्क?

निर्मला सीतारमण नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार- 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. निर्मला सीतारमण नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. सीतारमण यांची ही विक्रमी कामगिरी असेल. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला नवव्यांदा अर्थसंकल्प मांडतील. यावेळी भारत आणि अमेरिका यांच्यातील लांबलेला व्यापारी करार, अमेरिकेनं भारतावर लादलेलं टॅरिफ, आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाढलेली अस्थिरता या परिस्थितीत निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडणार आहेत. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करण्यासंदर्भात मोठे निर्णय घेतले जाऊ शकतात.