वृक्षप्रेमी महाराष्ट्रात कर्जतसारखीच 23 ठिकाणी वृक्षतोड भीमाशंकर’मध्ये 90 हजार झाडांची कत्तल..? ‘लिस्ट’ही आली समोर

0

कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पावरून सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हा प्रकल्प भीमाशंकर अभयारण्यापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर आहे.त्यामुळे या प्रकल्पासाठी भीमाशंकरच्या जंगलातील वन्यजीवांवर पर्यावरणावरही मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वृक्षतोडीचा दुष्परिणाम होण्याचा धोका आहे. याच पार्श्वभूमीवर खळबळजनक अपडेट समोर आली आहे.

राज्यातील विरोधक आणि पर्यावरणप्रेमी सामाजिक संस्थांनी महायुती सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच टोरंट पॉवर कंपनीसाठी होत असलेल्या वृक्षतोडीवरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडत असून राजकारण तापलं आहे. याचदरम्यान, माहिती कार्यकर्ते विजय कुंभारांनी भीमाशंकर जंगलात 34 हजार झाडांची नव्हे,तर 90 हजार झाडांची कत्तल होणार असल्याचा धक्कादायक दावा केला आहे.

अधिक वाचा  शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी

विजय कुंभार यांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरेंट पॉवर कंपनीच्या जलविद्युत ऊर्जा साठवण प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीशी संबंधित एक सोशल मीडियावरील X प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी भीमाशंकरप्रमाणेच राज्यात विविध 23 प्रकल्पांसाठी 23 ठिकाणी लाखो झाडांची कत्तल होणार असल्याचं विजय कुंभार यांनी म्हटलं आहे.महत्त्वाची बाब म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारांनी राज्यात कर्जतमधील भीमाशंकरप्रमाणेच विविध 23 प्रकल्पांसाठी 23 ठिकाणी लाखो झाडांची कत्तल होणार असल्याच्या त्यांच्या दाव्याबाबतची कागदपत्रेही समोर आणले आहेत.

विजय कुंभार पोस्टमध्ये म्हणतात,भीमाशंकरची वृक्षतोडच्या बदल्यात टोरंट कोयना धरण परिसरातील दोन गावांमध्ये वृक्ष लागवड करणार,असल्याचं सांगितलं आहे. मात्र,अद्यापतरी एकही झाड लावलं नाही, उलट कंपनीने त्या बदल्यात 3 कोटी 84 लाख रुपये देत,वृक्ष लागवड करण्याऐवजी हात वर केल्याचा धक्कादायक दावाही कुंभारांनी केला आहे.यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  राज्यात आर्थिक चणचणीमुळे दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा’ नाही; तीव्र दुष्काळ उत्सवात भीष्ण? विरोधकांचे राजकीय ‘तोंडसुख’ही सुरच

साईडोंगर हा एकमेव प्रकल्प नाही; महाराष्ट्रात असे तब्बल २३ पंप्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहेत!मग प्रत्येक ठिकाणी जनतेने आंदोलन करायचे आणि सरकारने प्रकल्पांचे समर्थन करायचे का? प्रत्येक भागाची भौगोलिक, सामाजिक आणि पर्यावरणीय परिस्थिती वेगळी आहे. पण सरकारला त्याचं काही देणंघेणं आहे की नाही? पर्यावरणाचा विचार न करता प्रकल्पांना पाठिंबा द्यायचा आणि जनतेला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवायचं, हाच सरकारचा विकास आहे का? असा संतप्त सवालही विजय कुंभारांनी आपल्या पोस्टमधून केला आहे.

यावेळी विजय कुंभारांनी त्यांच्या पोस्टमध्ये कंपन्यांच्या हितासाठी सरकारचा एवढा अट्टाहास,मग निसर्ग आणि जनतेच्या हितासाठी एवढीच तळमळ का नाही? प्रश्न एका साईडोंगरचा नाही; प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या भवितव्याचा असल्याचा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला आहे. कर्जत तालुक्यातील टॉरंट पॉवरचा अंदाजे 13,500 कोटी रुपयांचा जलविद्युत व ऊर्जा साठवण प्रकल्प होत आहे. हा प्रकल्प रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साईडोंगर-1 परिसरात उभारला जात आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हे स्थळ भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे 16 किलोमीटर अंतरावर आहे.

अधिक वाचा  पुणेकरांनो, उन्हाचा चटका आणखी वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज