कोथरूड परिसरातील महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणारा ‘दिवाळी बचत बाजार २०२६’ उत्साहात सुरू

0

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि नगरसेविका सौ. अल्पना गणेश वरपे यांच्या पुढाकारातून स्वा.वि.दा. सावरकर मैदान,उजवी भुसारी कॉलनी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी बचत बाजार – २०२६’ प्रदर्शन व विक्रीचे उद्घाटन सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या शुभहस्ते आणि खडकवासला मतदारसंघाचे आमदार मा. श्री. भीमराव अण्णा तापकीर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.. यावेळी स्थानिक नगरसेवक श्री.दिलीप जी वेडेपाटील,नगरसेवक श्री.किरण जी दगडे आणि नगरसेविका सौ.रुपालीताई पवार तसेच भाजपा पदाधिकारी आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  तुकाराम मुंढे यांना मोठा झटका थेट एफडीएचा हा आदेश रोखला; पुण्यातील रांजणगावची ही राजाश्रयाची कंपनी ठरली कारणीभूत

दिवाळीच्या सणानिमित्त महिला बचत गटांतील महिलांनी स्वतःच्या मेहनतीने, कौशल्याने आणि कल्पकतेने तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रदर्शनामध्ये विविध महिला बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या आकर्षक दिवाळी सजावटीच्या वस्तू, आकाशकंदील, पणत्या, पूजेचे साहित्य, हस्तकला वस्तू, घरगुती उत्पादने तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. गरजू व होतकरू महिलांच्या हाताला काम आणि त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

अधिक वाचा  वारजे बदलतेय! पुण्यातील पहिल्या डिजिटल ‘सेवाधाम’ची अनोखी भेट; २४ तास तक्रार निवारण केंद्रासह विविध नागरी सुविधांचे भव्य लोकार्पण!

यावेळी बोलताना मा.चंद्रकांत दादा पाटील म्हणाले  “महिला बचत गटांच्या महिलांकडे कौशल्य, मेहनत आणि काहीतरी स्वतःचे निर्माण करण्याची जिद्द आहे. मात्र, त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठ आणि ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे. ‘दिवाळी बचत बाजार’ हा त्याच दिशेने टाकलेला एक प्रयत्न आहे. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिला बचत गटांनी तयार केलेल्या स्वदेशी वस्तूंची खरेदी करावी. आपल्या प्रत्येक खरेदीतून या महिलांच्या कष्टांना हातभार लागेल, त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना आत्मनिर्भर होण्यास प्रोत्साहन मिळेल.”

यंदाची दिवाळी स्वदेशी वस्तूंच्या खरेदीतून साजरी करूया आणि महिला बचत गटांच्या कष्टांना आपल्या खरेदीतून साथ देऊया, असे आवाहन आमदार आमदार भीमराव अण्णा तापकीर व नगरसेविका सौ. अल्पना वरपे यांनी मनोगत व्यक्त करताना नागरिकांना केले.

अधिक वाचा  झाडणकाम सध्या सुरू कामालाच मुदतवाढीसाठी जोरदार ‘लॉबिंग’ तात्काळ थांबवा: उज्वल केसकरांची आयुक्तांकडे धाव