कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आज गोकुळची ऐतिहासिक सुनावणी, महायुतीचे 12 संचालक उपस्थित? शशिकांत पाटील-चुयेकर यांची निवड टिकेलं?

0

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) अध्यक्ष निवडीवरून सुरू झालेल्या वादाबाबत उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल याचिकेवरील सुनावणी सोमवारी (ता.२) होणार आहे.

‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीसाठी २९ ऑक्टोबर रोजी नूतन संचालकांची पहिली बैठक झाली. या बैठकीला विरोधी गटाचे १२ संचालक अनुपस्थित राहिले. त्यामुळे कोरम पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही सभा तहकूब केली. त्यानंतर समविचारी आघाडीतर्फे संचालकांची बैठक घेऊन त्यात शशिकांत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली.

हीच निवड ग्राह्य मानावी, यासाठी समविचारीकडून सर्किट बेंचमध्ये शुक्रवारी याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी होऊन विरोधी आघाडीच्या १२ संचालकांना उपस्थित रहाण्याबरोबरच त्यांच्यासह शासनाला म्हणणे मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे. पुढील सुनावणी आज (ता. २) होत आहे. आजच्या सुनावणीला विरोधी आघाडीचे १२ संचालक उपस्थित राहाणार की त्यांच्याकडून वकिलांमार्फत म्हणणे सादर केले जाणार याविषयी उत्सुकता आहे.

अधिक वाचा  @भाजपा पर्मनंट कार्यकर्ता!; सत्ता भाजपाची, तरी दारुण पराभव का?; निष्ठावान कार्यकर्त्यांची पुण्यात खदखद व्हायरल