पुन्हा नवा डाव पुन्हा मनोमिलन? महायुतीत टोकाची तु तु मैं मैं असतानाच फडणवीसांसह ठाकरे बंधूंची बंद दाराआड चर्चा

0

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीच्या पाच जागांचे निकालाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडीनं पुणे, मराठवाडा आणि नागपूर पदवीधर अशा 3 तर महायुतीनं पुणे व अमरावती शिक्षक या 2 जागा जिंकल्या आहेत. सत्ताधारी-विरोधक या महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय संघर्षात माजी मुख्यमंत्री व शिवसेना(UBT)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सातत्यानं मुख्यमंत्र्‍यांवर जोरदार शा‍ब्दिक हल्ले चढवले जात आहेत. याचदरम्यान,मुंबईत तीनही दिग्गज नेते एकत्र आले आहेत.

मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या मराठी व्यंगचित्रकलेचा 100 वर्षांचा प्रवास मांडणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीनही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा पार पडली.या निकालानंतर राज्याच्या राजकारणात त्यातही महायुतीत आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला आहे. याचदरम्यान, मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे बंधू यांच्यात बंद दरवाजाआड गुप्त चर्चा झाली आहे.

अधिक वाचा  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रिम मदत! कोणाला पैसे, कोण वंचित निकष काय? सविस्तर वाचा

राज्यात एकीकडे ज्ञानेश कुमार, निवडणूक आयोग,एसआयआर प्रक्रिया,मतचोरी,प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरण, स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची आंदोलनं आणि कर्जत वृक्षतोड यांसारख्या विविध मुद्द्यांनी राजकारण तापलं आहे.

राज्यात सुरू असलेली बदलते राजकीय समीकरणं,वेगवान घडामोडींच्या सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या तिन्ही प्रमुख नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली? याबाबत राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क चर्चांना उधाण आले आहे. या तीनही नेत्यांभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरताना दिसून येत आहे.

काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजप, मुख्यमंत्री फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला होता. ठाकरे पिता-पुत्र हे विविध मुद्द्यांवरुन सातत्यानं भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ले चढवत आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनीही गेल्या काही महिन्यांपासून फडणवीस यांच्यावर टीकेच्या तोफ डागताना दिसून येत आहे.

अधिक वाचा  एसएनडीटी मेट्रो स्टेशन वाहतूक कोंडी मुक्त? ‘या शासकीय जागेचा वापर करा’ पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी