पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

0

राज्यात पाच पदवीधर-शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. २३ ऑक्टोबरला मतदान तर २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक नेमकी कशी असते, मतमोजणीची प्रक्रिया काय हे समजून घेणे महत्वाचे आहे.

शिक्षक मतदारसंघात मतदाराची पात्रता काय?

निवडणूक आयोगाच्या निकषानुसार संबंधित पात्रता कालावधीतील मागील सहा वर्षामध्ये किमान तीन वर्षे शिक्षक म्हणून काम केलेले असणे आवश्यक आहे. संबंधित शिक्षणसंस्थेचा दर्जा माध्यमिक शाळेपेक्षा कमी नसावा, अशीही अट आहे. यासाठी संस्थेच्या प्रमुखाकडून आवश्यक प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया आहे. शिक्षक मतदार म्हणून नोंदणीसाठी निवडणूक आयोगाने फॉर्म १९ आणि संस्थेच्या प्रमुखाचे प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे उपलब्ध करून दिली आहेत.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

उमेदवार शिक्षकच असावा अशी अट नाही

शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवणारा उमेदवार स्वतः शिक्षक असणेही बंधनकारक नाही. या मतदारसंघातील ‘शिक्षक’ ही ओळख मतदारसंघातील मतदारांची आहे; उमेदवाराची अनिवार्य पात्रता नाही. विधान परिषदेसाठी उमेदवाराचे वय किमान ३० वर्षे असणे आवश्यक आहे. उमेदवार भारतीय नागरिक असावा आणि संबंधित राज्यातील विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत त्याचे नाव असणे आवश्यक आहे.

पहिल्या पसंतीत विजय झाला नाही तर?

मतमोजणीसाठी एकल संक्रमणीय मतपद्धती वापरली जाते. या प्रक्रियेत विजयासाठी आवश्यक कोटा ठरवला जातो. समजा एका शिक्षक मतदारसंघात एकूण १० हजार वैध मते पडली, तर जागांची संख्या अधिक १ म्हणजे एकूण वैध मतांना २ ने भागणे आणि त्यात १ मिळवणे. त्यामुळे या उदाहरणात विजयासाठी आवश्यक असलेला कोटा हा ५००१ मे असेल. एखाद्या उमेदवाराने आवश्यक कोटा पूर्ण केल्यास तो विजयी ठरतो. जर आवश्यक कोटा पूर्ण झाला नाही आणि पुढील गणिताची गरज भासली, तर सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाद करून त्याच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीनुसार मते संबंधित उमेदवारांकडे हस्तांतरित केली जातात. म्हणूनच या निवडणुकीत दुसरी आणि तिसरी पसंतीही निकालाच्या गणितात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीतील विसंवाद कायम

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार

प्रक्रिया किचकट आणि वेळखाऊ

एखादा उमेदवार पहिल्या पसंतीचा मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यास जेवढी पसंती क्रमाची मते असतात तेवढी सारी मते मोजावी लागतात. तेवढे करूनही उमेदवाराला मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही तर सर्व मतांची मोजणी होऊन सर्वाधिक मते मिळालेला उमेदवार विजयी घोषित केला जातो. ही मतमोजणीची प्रक्रिया वेळकाढूपणाची आहे. यामुळे मतमोजणीला बराच वेळ लागतो.