पदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा मतदारांच्या घरोघरी संपर्क; मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिकही दिले

0

कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी मतदारांना मतदान प्रक्रियेची माहिती देत मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचार मोहिमेदरम्यान भाजपचे कोल्हापूर शहराध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे आणि आप्पा लाड उपस्थित होते.

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचत असताना, चंद्रकांतदादा पाटील यांनी मतदारांच्या भेटीगाठींवर भर दिला. घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांनी मतदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच, मतदारांना मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक देऊन मतदान करताना घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  राज्यात आर्थिक चणचणीमुळे दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा’ नाही; तीव्र दुष्काळ उत्सवात भीष्ण? विरोधकांचे राजकीय ‘तोंडसुख’ही सुरच

यावेळी भाजप-महायुतीच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.