बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने वर्षावास मालिकेच्या द्वितीय पुष्पाचे आयोजन

0

गुहागर दि. ६ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ (रजि.), गुहागर, जि. रत्नागिरी आणि संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत सालाबादप्रमाणे याही वर्षी वर्षावास प्रवचन मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रवचन मालिकेचे पहिले पुष्य गाव शाखेच्या वतीने जानवळे, शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आले होते तर सदर प्रवचन मालिकेचे द्वितीय पुष्प रविवार, दि. ९ ऑगस्ट २०२६ रोजी मुंबई शाखा अध्यक्ष अशोक कदम यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ४.०० वाजता मुंबईतील बालमित्र क्रीडा मंडळ, नायगाव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, जुनी बी.डी.डी. चाळ क्र. ३अ व ४अ मध्ये, एस.एस. वाघ मार्ग, नायगाव, दादर (पूर्व), मुंबई – १४ येथे होणार आहे.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

सदर प्रवचन मालिकेचं ‘विश्वगुरू भगवान बुद्ध’ या विषयावर बौद्धाचार्य मनोज पवार हे मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान मुंबई शाखा अध्यक्ष अशोक कदम भूषविणार असून संस्कार समितीचे अध्यक्ष संदीप गमरे हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस प्रदीप कदम आणि संस्कार समितीचे चिटणीस सचिन मोहीते हे करणार आहेत.

सदर प्रवचन मालिकेस प्रमुख विश्वस्त सिध्दार्थ पवार, माजी प्रमुख विश्वस्त संजय पवार, माजी विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, एस. बी. जाधव, के. सी. जाधव, विश्वस्त दीपक जाधव, पांडुरंग गमरे, माजी कार्याध्यक्ष संजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून मुंबई शाखा कार्याध्यक्ष दिपक मोहिते, चिटणीस अनुराग जाधव, कोषाध्यक्ष अजित पवार, सदस्य धर्मानंद जाधव, अमित पवार, संजय कदम, सुनिल जाधव, अंतर्गत हिशेब तपासणीस अरुण जाधव, उपकार्याध्यक्ष अरविंद जाधव, उपाध्यक्ष मंगेश कळंबे, न्यायदान कमिटीचे अध्यक्ष संजय पवार, विवाह मंडळचे अध्यक्ष धम्मवर्धन तांबे, शिक्षण कमिटीचे अध्यक्ष संजीवन यादव, माजी अध्यक्ष सुरेश पवार, माजी सरचिटणीस संदेश गमरे, माजी अंतर्गत हिशेब तपासणीस शैलेंद्र पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तरी विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती पदाधिकारी, विभाग अधिकारी, उपसमित्या व त्यांचे पदाधिकारी तसेच बौद्ध समाजातील उपासक-उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात संदीप कदम, कार्याध्यक्ष दीपक मोहिते, सरचिटणीस प्रदीप कदम यांनी केले आहे.

अधिक वाचा  बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस? हवामान विभागाचा मोठा इशारा!