पुण्याच्या पायाभूत विकासाला मोठा वेग; विमानतळासाठी मेट्रो तर ‘या’ मार्गावर होणार भव्य दुहेरी उड्डाणपूल

0

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला मेट्रोने जोडणारा कल्याणीनगर ते पुणे विमानतळ हा नवा मेट्रो मार्ग अंतिम करण्यात आला आहे. तसेच वनाज ते चांदणी चौक या विस्तारित मेट्रो मार्गावर पौड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कचरा डेपोपासूनच दुहेरी उड्डाणपूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गाचा सुधारित आराखडा लवकरच तयार करण्याची सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक विमान वाहतूक राज्यमंत्री मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास दिल्या आहेत.

पुणे मेट्रो आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पांवर मेट्रो भवन येथे झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, संचालक विनोदकुमार अग्रवाल, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

 कर्वे रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल

पौड फाट्यापासून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या मेट्रो मार्गावर पौड फाट्यापासून तर थेट वनदेवी मंदिरापर्यंत दुहेरी उड्डाणपूलाचे नियोजन करण्याबाबत मंत्री मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास सूचित केले असून याबाबत पुढील कार्यवाही लवकरच सुरु होत आहे. पूर्वी या मार्गावर पौड फाटा ते कर्वे पुतळादरम्यान केवळ वाहनांसाठी उड्डाणपूलाचे नियोजन होते. आता थेट वनदेवीपर्यंत मेट्रोसहित दुहेरी उड्डाणपूल होणार आहे. या दुहेरी उड्डाणपूलामुळे या परिसरातील स्थानिक नागरिकांसह डेक्कनहून वारजेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय पाच सिग्नलचे चौक वाहतूक कोंडीमुक्त होणार आहेत.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

चांदणी चौक- वाकड दरम्यान मेट्रो

शेवाळेवाडी-हडपसर-कात्रज हा नियोजित मार्ग चांदणी चौक- वाकडपर्यंत वाढविण्यात यावा, अशा सूचना मोहोळ यांनी मेट्रो प्रशासनास दिल्या असून या मार्गासाठीचा डिपीआर करण्याचेही आदेशही त्यांनी मेट्रो प्रशासनास दिले आहे. या मार्गामुळे शहराभोवती मेट्रोचे जाळे निर्माण होण्यास मदत होणार असून मार्गावरील उपनगरातील नागरिकांना मेट्रोची कनेक्टिव्हीटी उपलब्ध होणार आहे.

”पुणे शहराच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच प्रकल्पांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करून कामांना गती द्यावी. ”

– मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री

अधिक वाचा  राज्यात आर्थिक चणचणीमुळे दिवाळीचा ‘आनंदाचा शिधा’ नाही; तीव्र दुष्काळ उत्सवात भीष्ण? विरोधकांचे राजकीय ‘तोंडसुख’ही सुरच