किशोर साळवी यांचा टेनिस क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र पोलिसांकडून गौरव

0

मुंबई, दि. १४ (रामदास धो. गमरे) टेनिस खेळाच्या प्रचार आणि प्रसारासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल किशोर साळवी यांना महाराष्ट्र राज्य पोलिस, रेल्वे विभागाच्या वतीने “Letter of Appreciation” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान महाराष्ट्र राज्याचे रेल्वे विभागाचे पोलीस महासंचालक (Director General of Police, Railways) प्रशांत बुर्डे (IPS) यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. टेनिस खेळाच्या विकासासाठी दाखवलेले समर्पण, उत्साह आणि सातत्यपूर्ण कार्य याची दखल घेत हा गौरव करण्यात आला.

एनएससीआय (NSCI) येथे आयोजित कार्यक्रमात किशोर साळवी यांच्या टेनिस क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या योगदानामुळे अनेक खेळाडूंना प्रेरणा मिळाली असून टेनिसच्या प्रसाराला चालना मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

अधिक वाचा  पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ चंद्रकांतदादांचा पुण्यातही घरोघरी प्रचार; महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयीचा निर्धार

सन्मानपत्रात त्यांच्या समर्पण, मेहनत आणि टेनिसच्या प्रोत्साहनासाठी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. हा सन्मान त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कार्याला मिळालेली महत्त्वपूर्ण पावती मानली जात आहे.

या गौरवाबद्दल क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, मित्रपरिवार आणि चाहत्यांकडून किशोर साळवी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.