हवेली तालुक्यात अहिल्यादेवी जयंती उत्सवात दोन गटात हाणामारी, ५ जखमी परस्परविरोधी गुन्हे दाखल

0

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवात जुन्या वादातून दोन गटात लोखंडी रॉड, लाकडी दांडके आणि दगडांनी तुंबळ हाणामारी झाली आहे. यामध्ये ५ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी ७ जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर घटना हवेली तालुक्यातील तरडे येथील गवतेमळा परिसरात ३१ मे रोजी रात्रीच्या सुमारांस घडली आहे. याप्रकरणी चंपक उत्तमराव गवते (वय ४०) यांनी दिलेल्या तक्रारीवरून समीर प्रभाकर दाभाडे (अंदाजे वय २६), प्रभाकर दत्तात्रय दाभाडे (अंदाजे वय ५२) व अभिषेक प्रभाकर दाभाडे (अंदाजे वय २७ सर्व रा. गवतेमळा, तरडे ता. हवेली, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अभिषेक प्रभाकर दाभाडे (वय २७) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चंपक उत्तम गवते, आप्पा दिपक गवते, रूपक उत्तम गवते) व दिपक उत्तम गवते (सर्व रा.तरडे, ता. हवेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या घटनेत फिर्यादी चंपक गवते हे अहिल्यादेवी जयंतीचा कार्यक्रम आटोपून ३१ मे रोजी रात्री कुटुंबासह घरी परतत होते. तेव्हा समीर दाभाडे याने गवते अडवून धमकी दिली. गावकऱ्यांनी मध्यस्थी करून वाद मिटवला. मात्र, काही वेळानंतर समीर दाभाडे, प्रभाकर दाभाडे आणि अभिषेक दाभाडे हे गवते यांच्या घरासमोर आले व शिवीगाळ करत वाद घातला.समीर दाभाडे याने लोखंडी रॉडने चंपक गवते यांच्यावर हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या दिपक गवते, सिता गवते आणि इतर कुटुंबीयांनाही मारहाण करण्यात आली. या धक्काबुक्कीत भांडण सोडवण्यासाठी आलेल्या प्रियंका दिपक गवते यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळ्यांचे मंगळसूत्र तुटून गहाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

दुसऱ्या घटनेत, अभिषेक दाभाडे व त्यांचा भाऊ समीर हा जयंतीनिमित्त झालेल्या जेवणाचा कार्यक्रम आटोपून मित्रांसह घरासमोरील बाकावर बसले होते. तेव्हा चंपक गवते व आप्पा गवते हे तेथे आले आणि त्यांनी विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.यानंतर रूपक गवते आणि दिपक गवते हेही तेथे आले व समीरला मारहाण करण्यात सुरवात केली.

भावाला वाचवण्यासाठी गेलेल्या अभिषेक दाभाडे यांच्यावर उत्तमराव गवते यांनी लोखंडी रॉडसदृश वस्तूने डोक्यात प्रहार केला. तसेच “तू आधीपासूनच माझ्या डोक्यात होतास, तुझा आज संतोष देशमुखच करतो,” अशी धमकी चंपक गवते यांनी दाभाडे यांना दिली आहे. यानंतर आरोपींनी दगड फेकून मारहाण केल्याने दाभाडे यांना दुखापत झाली आहे. घटनेनंतर दोन्ही गटांनी उपचार घेत पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून, घटनेमागील नेमके कारण, हाणामारीची सुरुवात कोणी केली आणि प्रत्यक्षात काय घडले याचा तपास सुरू आहे.

अधिक वाचा  गोकुळचा ‘अध्यक्ष’निवड नवा ट्विस्ट; …तरच सतेज पाटलांनाच संधी? फक्त ही नोटीस सर्व २५ संचालकांना विहित वेळेत पाठवणे बंधनकारक