तामिळनाडूत मोठी खळबळ, थलापती विजयकडे देशाचे लक्ष! या बड्या पक्षाचे तब्बल 30 आमदार थेट 2 तुकडे?

0

तामिळनाडूच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता असलेला आणि राजकारणात उतरलेल्या थलापती विजय याचा टीव्हीके हा पक्ष सर्वात मोठा ठरला आहे. या पक्षाला एकूण 108 जागा मिळाल्या आहेत. तामिळनाडूत सत्ता स्थापन करायची असेल तर 118 जागा जिंकणे गरजेचे आहे. म्हणजेच टीव्हीके या पक्षाला एकूण दहा जागा कमी पडत असल्याने आता काँग्रेस तसेच सीपीआय, सीपीआयएम या पक्षांची मदत घेऊन सरकार स्थापन करण्याचा विचार केला जात आहे. दरम्यान तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एक धक्कादायक आणि मोठी माहिती समोर येत आहे. थलापती विजयमुळे एका मोठ्या पक्षात फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एक मोठा पक्षाची थेट दोन शकलं होणार असल्याचे म्हटले जात असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार आता ऑल इंडिया अन्न द्रमुख मुन्नेत्र कळघम अर्थात एआयएडीएमके या पक्षातील नवनिर्वाचित आमदारांत सध्या अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही आमदारांना सत्तेत सामील झाले पाहिजे असे वाटत आहे. तर काही आमदारांच्या गटाला विरोधी बाकावरच बसायला हवे, असे वाटत आहे. त्यामुळे या पक्षात उघड उघड दोन गट पडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार AIADMK पक्षं एकूण 47 आमदारांपैकी 30 पेक्षा जास्त आमदार पक्षातून बाहेर पडून थलापती विजयला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. या 30 आमदारांच्या गटाचे सीव्ही षणमुगम हे नेतृत्त्व करत आहेत. लवकरच AIADMK पक्षाचे आमदार षणमुगम यांच्या निवासस्थानी पोहोचण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

आमदारांची नियोजित बैठक टळली

आज (6 मे) AIADMK पक्षाच्या आमदारांची महत्त्वाची बैठक होणार होती. परंतु ऐनवेळी 30 पेक्षा जास्त आमदारांचा सत्तेत सामील होण्याकडे कल असल्याने ही बैठक ऐनवळी पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक होऊ शकलेली नाही. त्यामुळेही AIADMK पक्षाचे दोन तुकडे होतात की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, टीव्हीके पक्षाला पाच जागा जिंकणारी काँग्रेस तसेच डावे पक्ष पाठिंबा देण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.