चेन्नईच्या ताफ्यात खतरनाक गोलंदाज दाखल; प्लेऑफच्या आशा बळावल्या मुंबई इंडियन्सच्या सामन्याआधी ताकदीत दुप्पट वाढ! 

0

आयपीएल २०२६ स्पर्धेत पाच वेळचा चॅम्पियन संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. पण गेल्या ३ सामन्यांमध्ये चेन्नईची गाडी रुळावर परतली आहे.गेल्या ३ पैकी २ सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जने विजय मिळवला आहे. चेन्नईला सुरूवातीच्या सामन्यांमध्ये अनेक मोठे धक्के बसले आहेत. एमएस धोनी दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. डेवाल्ड ब्रेव्हिने पुनरागमन केल्यानंतर आता आयुष म्हात्रे ३ आठवड्यांसाठी बाहेर झाला आहे. दुखापतीच्या धक्क्यांनंतर आता चेन्नईला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज संघासोबत जोडला गेला असून तो लवकरच खेळताना दिसू शकतो.

अधिक वाचा  केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी

चेन्नई सुपर किंग्ज संघातील गोलंदाज नॅथन एलिस दुखापतग्रस्त झाल्यानंतर त्याची रिप्लेसमेंट म्हणून स्पेंसर जॉन्सनला संधी दिली गेली होती. तो २० एप्रिलला संघासोबत जोडला जाणार असल्याची माहिती दिली गेली होती. आता त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करून चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाल्याची बातमी दिली आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो चेन्नईतील एमएस धोनीच्या 7 पॅडेल ब्रँडजवळ असल्याचं दिसून येत आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना बलाढ्य मुंबई इंडियन्सविरूद्ध होणार आहे. हा सामना अतिशय खास असतो. २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. काही दिवसांपू्र्वीच चेन्नईला आणखी एक मोठा धक्का बसला होता. वेगवान गोलंदाज खलील अहमद दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या जागी आता स्पेंसर जॉन्सन आल्याने चेन्नईची ताकद वाढणार आहे. आता चेन्नई सुपर किंग्ज संघ त्याला खेळण्याची संधी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

चेन्नईचा संघ गुणतालिकेत कितव्या स्थानी?

पाच वेळचा चॅम्पियन असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघ या हंगामात विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत. यापैकी २ सामन्यांमध्ये चेन्नईने विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यांमध्ये चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. ४ गुणांसह चेन्नईचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानी आहे. चेन्नईकडे अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी आहे.