गुवाहटीत २६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! Orange Capसह वैभव सूर्यवंशी हिरो ठरला

0

गुवाहटीच्या मैदानात १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीतील ताकद दाखवून दिली. २६ चेंडू अन् ४१ मिनिटांत ७८ धावांच्या ब्लॉकबस्टर शोसह त्याने क्रिकेट चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारी खेळी केली. भुवीच्या गोलंदाजीवर षटकार खेचत १५ चेंडूत अर्धशतक साजरे केल्यावर शतकाच्या दिशने वेगाने आगेकूच करत असताना क्रुणाल पांड्याने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले. पण तोपर्यंत त्याने वादळी खेळीसह RCB ला बॅकफुटवर ढकलले होते. एवढेच नाही तर आपला सहकारी यशस्वी जैस्वालला मागे टाकत त्याने ऑरेंज कॅपवरही कब्जा केला.

उत्तुंग फटकेबाजी अन् RCB च्या पूर्ण डावातील षटकारांची बरोबरी

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

मुंबई इंडियन्सविरुद्ध जसप्रीत बुमराहचे षटकाराने स्वागत करणाऱ्या वैभव सूर्यवंशीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात स्विंगचा किंग भुवनेश्वर कुमारला खणखणीत चौकार मारत डावाची आक्रमक अंदाजात सुरुवात केली. स्ट्राईकवर आल्यावर त्याने पहिल्याच षटकात सलग दौन चौकार मारले. मॅच विनरच्या रुपात जगात गाजावाजा असलेल्या जोश हेजलवूडलाही त्याने सोडले नाही. या दोघांशिवाय विकेट घेणाऱ्या क्रुणाल पांड्यासह टीम डेविड आणि अभिनव सिंग यांना आसमान दाखवताना त्याने आपल्या बॅटमधून ७ उत्तुंग षटकारांची आतषबाजी केली. हा आकडा RCB च्या ‘द्विशतकी’ डावातील षटकारांच्या बरोबरीचा आहे.

ऑरेंज कॅप पटकावली

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

वैभव सूर्यवंशीनं रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध यंदाच्या हंगामातील दुसरे अर्धशतक साजरे करताना सर्वोच्च खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर ४ सामन्यातील ४ डावात ५० च्या सरासरीसह सर्वोच्च २६६.६७ च्या स्ट्राईक रेटसह त्याने २०० धावा आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल १८३ धावांसह त्याच्यापाठोपाठ दुसऱ्या स्थानावर आहे.

वैभव सूर्यवशी छोटा पॅक बडा धमाका सिक्सर किंग!

वैभव सूर्यवंशी याने चौथ्या सामन्यातील ७ षटकारांसह आतापर्यंत १८ षटकार मारले आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याच्या पाठोपाठ रजत पाटीदार आहे. ज्याने ३ सामन्यात १३ षटकार खेचले आहेत. त्यापाठोपाठ समीर रिझवी ३ सामन्यात ११, यशस्वी जैस्वाल ४ सामन्यात १० या बॅटर्संनी आतापर्यंत षटकारांचा दुहेरी आकडा गाठला आहे.

अधिक वाचा  शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी