सकल हिंदू समाज अभिमानाची लगबग अन् भव्य सोहळाही!; निमंत्रण हिंदुत्वाच,स्नेहाचं! आपुलकीचं ‘गो-माते’च्या नामकरणाचं

0

गो-माता सकल हिंदू समाजाचा अभिमान, स्वाभिमान! गोमातेची सेवा ही ईश्वर सेवा अशी हिंदू धर्मामध्ये असलेले भावना आणि त्याच गोमातेच्या सेवेसाठी हिंदू समाजाचे असलेली आस्था सर्वश्रुत आहे. पुण्यामध्ये आज सकल हिंदू समाजाची एक अभिमानास्पद लगबग सुरू झाली आहे, ती म्हणजे गो-मातेच्या कन्येचं बारसं! खडकवासला भारतीय जनता पक्षाचे पर्यावरण आघाडी प्रमुख संजय वाल्हेकर अन् सर्व ट्रस्टी मंडळीच्या वतीने या अनोख्या अभिमानास्पद उपक्रमाच्या आयोजन करण्यात आले आहे.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्याची सांस्कृतिक राजधानी कोथरूडलगतच्या श्री गुरूदेव दत्त सेवा ट्रस्ट वाल्हेकर दत्त मंदीर वारजे येथील दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये भाविक भक्तांच्या सेवेसाठी कायमस्वरूपी असलेल्या गोमातेला कन्यारत्न प्राप्त झालं आणि सर्व भाविक भक्तांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले. दत्त महाराजांची सजीव ठेव म्हणून भाविक भक्तांकडून परिसरात असलेल्या गौमातेची मनोभावे सेवा केली जाते. मंदिर परिसरामध्येच गोमातेची प्रसुती झाल्यानंतर जन्माला आलेल्या बाळाचा नामकरण सोहळा करण्याचे आयोजन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. सर्व दत्तभक्त व नागरिकांनी हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलेले गौमाता म्हणजे (राजमाता) लक्ष्मी हिच्या वासराचा नामकरण विधी, पाळणा आयोजित केलेला आहे. अश्या या अनोख्या कार्यक्रमांस आपल्या सर्व कुटूंबियांसह उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन संजय वाल्हेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

रविवार दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी, सायं. ५.३० वा. वाल्हेकर दत्त मंदिरात भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री. आमदार भिमराव (आण्णा) तापकीर, मा.श्री.गिरीषजी खत्री मंडल अध्यक्ष कोथरूड वि.स. भा.ज.पा, मा. श्री. धिरजजी घाटे अध्यक्ष पुणे शहर भा.ज.पा, श्री. सुशिलभाऊ मेंगडे (मा. नगरसेवक), श्री. दिलीपभाऊ बराटे (मा. उपमहापौर), मा.श्री. राजीवजी मोरे अध्यक्ष प्रभाग क्र. ३० भा.ज.पा., श्री. राजाभाऊ बराटे (नगरसेवक),श्री. भारतभूषण बराटे (नगरसेवक),श्री. सचिनभाऊ दोडके (नगरसेवक), श्री. प्रदीप वाजे सर (उपसचिव म. कर्वे श्री.शि.सं), सौ. रेश्माताई बराटे (नगरसेविका), श्री. किशोर येनपुरे (महामंत्री हिंदू अध्यात्मिक सेवा सं.), सौ. हर्षदाताई भोसले (नगरसेविका), श्री. संदिप सारडा (सहमंत्री हिंदू अध्यात्मिक सेवा सं.), सौ. तेजश्रीताई पवळे (नगरसेविका), सौ. सायलीताई वांजळे (नगरसेविका) यांच्यासह वारजे परिसरातील महिला भगीनी विश्व हिंदू परिषद वारजे माळवाडी प्रखंडचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

अधिक वाचा  दुसरी पसंती ठरवणार पुण्याचा शिक्षक आमदार, नेमकं गणित काय? निकालाआधीच सोप्या शब्दात समजून घ्या