कोथरूडमध्ये पौड रोड परिसरात एम एन जी एल गॅस ची गळती; स्थानिक नगरसेवकाची कार्यतत्पर योजना

0

कोथरूडमध्ये आज सकाळी पौड रोड परिसरात एम एन जी एल गॅसची गळती सुरू झाल्याने वनाझ परिसर व माधव भाग परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; स्थानिक नगरसेवक मनीषाताई संदीप बुटाला यांनी  कार्यतत्पर होत यामध्ये विशेष लक्ष घालून तात्काळ पुरवठा करणारी वाहिनी बंद करून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले. डॉ. संदीप बुटाला यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन समक्ष संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बोलवून तात्काळ वाहिनी बंद केली.

पौड रोड परिसरामध्ये अचानक  सार्वजनिक रस्त्यावर व परिसरामध्ये याचा वास सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नगरसेविका मनीषा बुटाला यांच्या वतीने संबंधित गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या पथकाला बोलवून याची तपासणी करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर परिसरातून वाहत असलेल्या नाल्यामध्ये संबंधित वाहिनी फुटल्याचे लक्षात आले. संपूर्ण परिसरात उग्र प्रकारचा वास येत असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार