पुण्यात खळबळ 27 वर्ष न्याय नाही; जिल्हा न्यायालयात तरुणाची आत्महत्या, चौथ्या मजल्यावरून मारली उडी

0

पुण्यातील जिल्हा न्यायालयामध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. केस चालत नाही, न्याय मिळत नाही यामुळे संतप्त झालेल्या पक्षकाराने चौथ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे न्यायालय परिसरात एकच गोंधळ उडाला. जिल्हा न्यायालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून या तरुणाने उडी मारत आयुष्य संपवलं. न्यायालयात आज सुनावणी होती. न्याय मिळत नसल्यामुळे या तरुणाने टोकाचे पाऊल उचलले. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीवरून उडी मारून एका पक्षकाराने आत्महत्या केली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवाजीनगर पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मृत तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. शिवाजीनगर पोलिस सध्या तपास करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, नामदेव जाधव असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. नामदेव हे पुण्यातील वडकी भागातील राहणारे होते. जमिनीच्या व्यवहारातून झालेल्या वादाच्या संदर्भात त्यांची केस पुणे न्यायालयात सुरू होती. गेल्या २७ वर्षांपासून त्यांची केस पुणे न्यायालयात सुरू होती. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या केसमध्ये न्याय मिळत नसल्याचा कारणातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अधिक वाचा  वृक्षप्रेमी महाराष्ट्रात कर्जतसारखीच 23 ठिकाणी वृक्षतोड भीमाशंकर’मध्ये 90 हजार झाडांची कत्तल..? ‘लिस्ट’ही आली समोर