राज्यात 13 वरिष्ठ आयएएस बदलले बदल्यांचा धडाका सुरुच! राहुल कर्डिलेंची महिन्याभरात तिसऱ्यांदा बदली

0

मुंबई : राज्यात नवीन सरकार आल्यानंतर बदल्यांचा धडाका सुरूच आहे. आताही राज्यातील 13 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रवीण दराडे यांची बदली सहकार आणि वस्त्रोद्योग खात्याच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. डॉ. प्रशांत नरनावरे यांची राज्यपालांचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. तर सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक राहुल कर्डिले यांची महिन्याभरात तिसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. राहुल कर्डिले यांची आता नांदेड जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

कोणाची बदली कुठे झाली?

1. प्रवीण दराडे (IAS:RR:1998) यांची प्रधान सचिव, (सहकार आणि विपणन), सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  विधान परिषद 5 जागांसाठी आज मतदान 182 उमेदवार रिंगणात; सर्वत्र बंडखोरीची धास्ती पण ‘मैत्रीपूर्ण’ लढतचा मुलामा!

2. श्री पंकज कुमार (IAS:RR:2002) यांची सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. श्री नितीन पाटील (IAS:SCS:2007) सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई यांची आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

4. श्रीमती श्वेता सिंघल (IAS:RR:2009) राज्यपालांच्या सचिव, महाराष्ट्र यांची विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. डॉ. प्रशांत नरनावरे, (IAS:RR:2009) सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी (2), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

6. श्री अनिल भंडारी (IAS:RR:2010) सह मुख्य कार्यकारी अधिकारी, MIDC, मुंबई यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

7. श्री पी.के.डांगे (IAS:SCS:2011) आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता, नवी मुंबई यांची सचिव, राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

8. श्री एस. राममूर्ती (IAS:RR:2013) सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण, मुंबई यांची राज्यपाल, महाराष्ट्र, मलबार हिल, मुंबई यांचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

9. श्री अभिजित राऊत (IAS:RR:2013) जिल्हाधिकारी, नांदेड यांची सहआयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

10. श्री मिलिंदकुमार साळवे (IAS:SCS:2013) सह आयुक्त, राज्य कर, छत्रपती संभाजी नगर यांची, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

11. श्री राहुल कर्डिले (IAS:RR:2015) सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको, नवी मुंबई यांची जिल्हाधिकारी, नांदेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. श्रीमती. माधवी सरदेशमुख (IAS:SCS:2015) मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण-डोंबिवली यांची संचालक, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

13. श्री अमित रंजन (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, चारमोशी उपविभाग, गडचिरोली यांची प्रकल्प अधिकारी, ITDP, पांढरकवडा, आणि सहायक जिल्हाधिकारी, केळापूर उपविभाग, यवतमाळ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.