ना दिखावा, ना दबाव लोकांसाठीच काम बोलतंय अन् प्रामाणिक भिमराव तापकीर नेतृत्वासाठी जनआशीर्वाद वाढतोय

0

खडकवासला मतदार संघात भिमराव तापकीर यांनी प्रचारात नागरिकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन भेटी गाठी द्वारे प्रचारात आघाडी घेतली आहे. ना दिखावा, ना दबाव – लोकांसाठी निःस्वार्थ नेतृत्व असलेले खडकवासला विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या मनामध्ये प्रामाणिकता, मितभाषी स्वभाव, आणि कामांमधून परिणाम साधणारे नेतृत्व म्हणून भिमराव अण्णा तापकीर यांची ओळख आहे. त्याचीच प्रचिती सलग चौथ्यांदा जनता दरबारात जात असताना प्रचंड उत्साही जनसमुदायाचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असून यंदाही मतदारांचा कौल कोणत्या बाजूने आहे याचा अंदाज येत आहे.

“गोंधळ न करता, गाजावाजा न करता, काम करत राहणे” हा त्यांचा स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतो. निस्वार्थीपणे जनतेसाठी कार्यरत असून प्रलोभनांना फाटा देत कामांवर भर: अण्णा कधीही मतदारांना खोटी आश्वासने किंवा प्रलोभने देत नाहीत. त्यांच्या मते, कामाची प्रामाणिकता आणि लोकांचा विश्वास हाच विजयाचा खरा मार्ग आहे. लोकांसाठी सतत उपलब्ध, कोणतीही अडचण असो, अण्णा नेहमी मतदारांच्या सोबत उभे असतात. त्यांच्या मितभाषी स्वभावामुळे प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याशी संवाद साधणे सोपे वाटते. कामगिरीचा पाया, विश्वासाचा आधार असल्याने गेल्या अनेक वर्षांतील त्यांच्या कार्याने खडकवासल्यात विकासाचे नवे अध्याय लिहिले आहेत.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

रस्ते, पाणीपुरवठा, समाविष्ट गावांमधील विकासकामे, वीजपुरवठा, पर्यटन विकास, ब्रिज, समाजमंदिर, ओपन जिम, सोसायट्याना वीज बिल बचतीसाठी सोलर प्रकल्प आणि इतर मूलभूत विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे.

आमचं काम बोलतंय” आम्ही मतदारांना गृहीत धरत नाही, आम्ही त्यांच्या विश्वासाची प्रामाणिकतेने उतराई होतो,” असे अण्णा नेहमी सांगतात. मतदारांनी दिलेला प्रत्येक मत हा विश्वासाचाच एक प्रकार असतो, जो प्रामाणिकपणे परत देणे हे आमचे कर्तव्यच आहे.

– भिमराव तापकीर

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?