राष्ट्रवादीला मिळणारी ही मंत्रिपदे? अजित पवारांकडे पुन्हा जलसंपदाच?

0

राजकीय वर्तुळात आज मोठ्या घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज अजित पवार यांच्यासह 9 जणांचा मंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान अजित पवार यांच्यासह नऊ राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाशी शपथ घेतली, त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार? याबाबतची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह जलसंपदा हे खाते असेल, असा अंदाज वर्तवला वर्तवण्यात येत आहे. अजित पवार यांच्या गटातील आमदारांना मिळणाऱ्या मंत्रिपदाबाबतची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा  शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी

अजित पवारांच्या गटाला मिळणारी संभाव्य मंत्रिपदे कोणती ?

अजित पवार : जलसंपदा

छगन भुजबळ : अन्न व नागरी पुरवठा

दिलीप वळसे पाटील : ऊर्जा

हसन मुश्रीफ : कौशल्य विकास

धनंजय मुंडे : गृहनिर्माण

आदिती तटकरे : महिला व बालकल्याण

संजय बनसोडे : पर्यटन

अनिल पाटील : लाभक्षेत्र विकास प्राधिकरण

धर्मरावबाबा आत्राम : आदिवासी कल्याण