पुणे: राजकारणात पदापेक्षा निष्ठेला, प्रसिद्धीपेक्षा कर्तृत्वाला आणि राजकीय यशापेक्षा सामाजिक बांधिलकीला अधिक महत्त्व देणारी माणसे समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतात. अशाच समर्पित कार्यकर्तृत्वाचा आणि जनसेवेचा प्रवास म्हणजे डॉ. संदीप बुटाला. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून तब्बल तीन दशकांपासून पौड रोड परिसरातील केळेवाडी सुतारदरा किष्किंधानगर सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेसोबत चार दशकांपासून एकनिष्ठपणे कार्यरत असलेले डॉ. बुटाला यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या सामाजिक, वैद्यकीय आणि संघटनात्मक वाटचालीचा गौरव करण्याचा विशेष दिवस.
चंद्रकांतदादांचा आशीर्वाद, ज्येष्ठ नेतृत्वाच्या विचारांचा वारसा आणि जनसेवेची चळवळीची कार्यवृत्ती यांच्या बळावर डॉ. संदीप बुटाला यांचा जनसेवेचा स्नेहदीप असाच अखंड तेवत राहो, हीच वाढदिवसानिमित्त ‘लोकायत न्यूज’कडून सदिच्छा!
वैद्यकीय सेवा हेच जनसेवेचे प्रभावी माध्यम
व्यवसाय म्हणून वैद्यकीय क्षेत्राकडे पाहण्यापेक्षा त्यातून समाजाची सेवा करण्याचा दृष्टिकोन डॉ. संदीप बुटाला यांनी जपला आहे. गेल्या तीस वर्षांपासून केळेवाडी सुतारदरा किष्किंधानगर सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेत वैद्यकीय सेवेमार्फत त्यांनी जनसामान्यांशी आपले नाते अधिक दृढ केले. आरोग्यसेवेच्या माध्यमातून माणसांशी जोडले जाणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि सामाजिक बांधिलकीतून मदतीसाठी तत्पर राहणे, ही त्यांच्या कार्याची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
प्रकाश जावडेकर आणि स्वर्गीय गिरीश बापट यांच्या विचारांचा प्रभाव
भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीशी चार दशकांपासून जोडलेले असलेल्या डॉ. बुटाला यांच्या राजकीय जडणघडणीत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांच्या विचारांचा महत्त्वपूर्ण प्रभाव राहिला आहे. संघटनात्मक शिस्त, कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध, पक्षविचारांप्रती निष्ठा आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांशी जोडलेले राहण्याची भूमिका त्यांनी आपल्या कार्यातून जपली आहे. राजकीय प्रवासात अनेक चढ-उतार येत असतानाही पक्षसंघटनेशी असलेली बांधिलकी कायम ठेवणे, हे त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
चंद्रकांतदादांचे विश्वासू आणि निष्ठावान सहकारी
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून डॉ. संदीप बुटाला यांची कोथरूडमधील राजकीय आणि संघटनात्मक वर्तुळात ओळख आहे. चंद्रकांतदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्षसंघटनेच्या कामात सातत्याने सक्रिय राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. नेतृत्वाचा आशीर्वाद आणि संघटनात्मक कामाची कार्यवृत्ती यांचा समन्वय साधत राजकीय क्षेत्रात आपली वाटचाल सुरू ठेवताना त्यांनी कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध जपण्यावर भर दिला आहे.
जिल्हा नियोजन समितीपासून स्थानिक संघटनात्मक कामापर्यंत
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे माजी अध्यक्ष म्हणून काम पाहिल्यानंतर डॉ. बुटाला यांनी संघटनात्मक क्षेत्रात आपला अनुभव अधिक व्यापक केला. सध्या पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून त्यांच्यावर सार्वजनिक विकासाशी संबंधित जबाबदारी आहे. स्थानिक प्रश्न, विकासाच्या गरजा आणि नागरिकांच्या अपेक्षा यांचा विचार करून सार्वजनिक जीवनात योगदान देण्याची संधी त्यांना या माध्यमातून मिळत आहे. राजकीय पदे ही केवळ प्रतिष्ठेची बाब नसून जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याची जबाबदारी आहे, हा दृष्टिकोन त्यांच्या सार्वजनिक जीवनातील वाटचालीतून अधोरेखित होते.
चार दशकांची निष्ठा, तीन दशकांची सेवा आणि पुढील वाटचालीचा संकल्प
डॉ. संदीप बुटाला यांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहताना तीन महत्त्वाचे पैलू ठळकपणे समोर येतात. पहिला म्हणजे तीन दशकांची वैद्यकीय सेवा, दुसरा म्हणजे चार दशकांची पक्षनिष्ठ आणि संघटनात्मक वाटचाल, तर तिसरा म्हणजे सामाजिक बांधिलकीतून जनतेशी जोडलेले राहण्याची वृत्ती.
राजकारण, वैद्यकीय क्षेत्र आणि सामाजिक कार्य या तिन्ही क्षेत्रांमध्ये सक्रिय राहून आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्यांच्यासाठी कार्यकर्ता ही केवळ राजकीय ओळख नसून समाजाशी जोडलेली जबाबदारी आहे.
वाढदिवस हा केवळ आनंदोत्सवाचा दिवस नसतो, तर आजवरच्या प्रवासाचा आढावा घेत भविष्यातील कार्याची दिशा निश्चित करण्याचाही दिवस असतो. डॉ. संदीप बुटाला यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या तीन दशकांच्या वैद्यकीय सेवेला, चार दशकांच्या राजकीय निष्ठेला आणि सामाजिक कार्याच्या ध्यासाला विशेष दाद द्यावी लागेल.




