तुकाराम मुंढे यांना मोठा झटका थेट एफडीएचा हा आदेश रोखला; पुण्यातील रांजणगावची ही राजाश्रयाची कंपनी ठरली कारणीभूत

0

एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे राज्यभरात कारवाई करत आहेत. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून कारवाईचा मोठा दणका सुरू आहे. सर्वसामान्य लोक तुकाराम मुंढे यांचे काैतुक करत आहेत. पण काही लोकांकरिता तुकाराम मुंढे अडचण बनले आहेत. कोणाही असो किंवा कोणाचीही कंपनी असो तक्रार आली की, तुकाराम मुंढे यांच्याकडून कारवाई केली जाते. तुकाराम मुंढे यांनी एफडीएमधून बदली होणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. राजस्थानला मुंढेंची बदली होणार असल्याचे मेसेज व्हायरल झाली. तुकाराम मुंढे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, माझी राज्याबाहेर बदली होऊ शकत नाही.

अधिक वाचा  सामाजिक बांधिलकीचा संवेदनशील ‘दीपक’; संघनिष्ठ दृढसंकल्पी कार्यकर्त्याचा खासदिनीही संवेदनशील उपक्रम

तुकाराम मुंढे यांच्यामुळे गुळातील रंग उडावा. जिलेबीचाही खरा रंग दिसत असून तशी विक्री केली जात आहे. अनेक खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ त्यांनी रोखली आहे. त्यातच आता तुकाराम मुंढे यांनी केलेली मोठी कारवाई पाण्यात गेल्याचे दिसत आहे. पुण्यातील रांजणगाव परिसरातील मिथेनॉल कंपनीवर तुकाराम मुंढे यांच्या विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, या कारवाईला स्थगिती देण्यात आली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी एफडीएने केलेल्या कारवाईला स्थगिती दिली आहे.

पुण्यातील विषारी दारू प्रकरणानंतर रांजणगावच्या मिथेनॉल कंपनीवर तुकाराम मुंडे यांनी मोठी कारवाई केली. पुण्यातील विषारी दारू प्रकरणात काही लोकांचा जीव गेला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मात्र, त्याच कारवाईला मंत्री झिरवाळ यांनी स्थगिती दिली. हेच नाही तर या स्थगितीमागे मोठे कारण असल्याचे सांगितले जातंयही संबंधित कंपनी थेट एका राष्ट्रवादीच्या नेत्याशी संबंधित असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळेच मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या कारवाईला स्थगिती दिली. तुकाराम मुंढे यांनी कंपनीवर कारवाई केली पण झिरवाळ यांनी कंपनीवरील कारवाईला स्थगिती दिली. झिरवाळ यांच्यावर दबाव याकरिता असल्याचे सांगितले जातंय. तुकाराम मुंढे यांनी एफडीएचा कारभार आपल्या हातात घेतल्यापासून 557 टक्के तक्रारीत वाढ झाली.

अधिक वाचा  टोल नाक्यापासून २० किमी परिसरात राहणाऱ्यांना मोठा दिलासा! हजारो रूपये वाचणार; १ नोव्हेंबरपासून नवा नियम लागू